पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्ध मोठी कारवाई
एकूण147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून जप्त

तालुका व शहर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक पाच मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स वि फाईव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये इसम नामे प्रदीप दत्तात्रय हिवरे वय 20 वर्षे राहणार पुरांडवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस केली असता सदर कार मध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्र वासाचा एकूण 72 पाकिटामध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थित वजन केला असता एकूण 147 किलो ग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्रा xuv500 तिचा नंबर mh 12 एच व्ही 56 66 कार एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे सदर गाडीतील इसम प्रदीप दत्तात्रय दत्तात्रय हिवरे वय वीस वर्षे राहणार पुरंदावडे माळशिरस याचे व त्याचे तीन साथीदार नामे गणेश हनुमंत पवार गणेश हनुमंत पवार राहणार जिंपुरी तालुका माळशिरस राहणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुळीक राहणार गुरसाळे तालुका माळशिरस यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस NDPS अॅक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची ही अवैध गांजाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली असून एकूण 147 किलो इतका गांजा व कार असा चाळीस लाखाचा मुद्देमान पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके पीएसआय विक्रम शेठ वडणे पीएसआय भारत भोसले, पीएसआय घुंगुरकर, पीएसआय पिसाळ, सहाय्यक फौजदार विजू गायकवाड,सहायक फौजदार दत्तात्रय तोंडले, साह फौजदार शरद कदम पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस हवालदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर साहेब सह फौजदार शरद कदम पोलीस हवालदार सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे पोलीस हवालदार प्रसाद आवटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांच्या पथकाने केली आहे.