राज्यात गुंडांचे नियम आहेत का कायद्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेचा राज्यसरकारला खडा सवाल
बालरोगतज्ञ डॉ. हणमंत धर्मकारे हत्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी यांना डॉक्टर धर्मकारे हत्येप्रकरणी निवेदन देताना प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे, प्रदेश कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, शब्बीर शेख दतात्रेय लिंबे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:– बाल रोगतज्ञ डॉ. हणमंत धर्मकारे राहणार कोल्हेबोरगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांची हत्या यवतमाळ जिल्ह्यात काही गुंडानी ते गरिबांना मोफत सेवा देत असल्याच्या कारणाने केली असून, सदर प्रकरणी पुरोगामी संघर्ष परिषद प्रदेश कार्यकारणी आक्रमक झाली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी थेट गृहमंत्र्यांना सवाल केला आहे की, राज्यात गुंडांचे नियम आहेत की कायद्याचे यासंदर्भातील निवेदन साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी याना पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मा. नितीनभाऊ तुपे व राज्याचे महासचिव मा. मारुतीराव बोभाटे यांना दिले असून सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करा आणि मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करण्यासाठी जलद गतीने तपास व्हावा अशी मागणी केली असून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे संघटक शब्बीर शेख, दत्तात्रय लिंबे, सुरज रोकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.