पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ सविता बनसोडे
राष्टिय अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी दिले निवडीचे पत्र

सातारा येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनी आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ. सविता बनसोडे यांना निवडीचे पत्र देताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे, प्राचार्य बाळासाहेब साठे, पांडुरंग रणदिवे, नितीन तुपे , मारुतीराव बोभाटे व इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सातारा*-(महाराष्ट्र):- 7जानेवारी
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा महाराष्ट्र राज्यातील सातारा येथे आयोजित केला होता.
सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे होते या मेळाव्यामध्ये कर्नाटक राज्याच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूर (तालुका अथणी) येथील सौ. सविता स्वप्निल बनसोडे यांची निवड करून प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे,महाराष्ट्र राज्य संस्थापक कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, संस्थापक राज्य महासचिव मारुतीराव बोभाटे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते माननीय पांडुरंग रणदिवे, महाराष्ट्राचे सरचिटणीस युवराज (तात्या) सोनवले, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख तथा बेळगाव विभागाचे अध्यक्ष माननीय लखनजी वायदंडे पशु महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष अंकुश भोंडे ,पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे ,पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा वनिता जाधव, पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस छाया मोरे, पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख श्रीमती शोभा पारधे, कुमारी नयना लोंढे, कृष्णाजी गायकवाड ,संजय साठे, विजयभाऊ सावंत ,नेताजी अवघडे ,प्रकाश वायदंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.