Uncategorized

ज्येष्ठ नागरिक भागवत शिंदे यांच्या एकषष्ठी निमित्त चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-ज्येष्ठ नागरिक भागवत शिंदे यांच्या एकषष्ठी निमित्त जि.प. प्राथ शाळा भुईटेवस्ती, पळशी येथे 26जानेवारी शालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.दिलेल्या विषयावरून विद्यार्थ्यांनी मुक्तपणे चित्रे रेखाटली.
या स्पर्धेत सहभागी पैकी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले.
 गट अ
कु.स्वरा माने
चि. आदित्य केंजळे
कु. समृध्दी जगताप
     गट ब
कु.राधिका लोखंडे
कु. ज्ञानेश्वरी वाघमारे
चि. प्रणव माने
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी माजी सरपंच गोपाळ झांबरे, विद्यमान उपसरपंच सचिन शिंदे यांच्याहस्ते रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.यावेळी नवनाथ भुईटे,दिलीप माने, धनाजी कलागते,बालाजी मोरे,बिराजी काळे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. मुख्याध्यापक झांबरे सर,माळी सर,जवळेकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close