न.पा.सेवानिवृत्त कर्मचार्याचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरु..
न.पा.प्रशासनाने प्रश्न प्रलंबित ठेवल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-नगरपलिका पंढरपुर येथील सेवानिवृत्त कर्मचारी यांची २०१९पासुन प्रलंबित असलेली ग्रँच्युयटी त्वरीत मिळावी,सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम मिळावी,हक्क रजेचा पगार त्वरीत मिळावा,सेवा निवृत्ति वेतन १ ते७ तारखे दरम्यान मिळावे या मागण्यासाठी सेवानिवृत्त सफाई कर्मचारी ज्ञानेश्वर वाघमारे, गमजी वाघेला,चंद्रकांत साबळे, दास आंबुरे, हे आज दि.२५ आक्टोंबर पासुन नगरपलिका गेट जवळ आमरण उपोषणास बसले आहेत.
उपोषण स्थळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल अभंगराव,अ.भा.सफाई मजदूर संघटना तालुकाध्यक्ष गुरु दोडिया, न.पा.इंटक युनियन चे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक महेश साठेडाँ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिति व इंटकचे उपाध्यक्ष अँड.किशोर खिलारे यांनी भेट देऊन पांठिबा दिला आहे.
प्रशासनाने त्वरित प्रश्न सोडवावा अशी सर्वानी मागणी केली आहे.