Uncategorized

पंढरीत आंतरराष्ट्रीय तत्ववेक्त्या स्मृतीशेष डाँ. गेल आँम्वेट यांचा पुण्यमोदनाचा कार्यक्रम संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपुर:-आंतरराष्ट्रीय तत्ववेक्त्या स्मृतीशेष डाँ. गेल आँमव्हेट यांचा पुण्यमोदनाचा कार्यक्रम पंढरपुरात जेठाभाई जाधवजी धर्मशाळा संपन्न झाला.
श्रमिक मुक्ती दलाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अमेरीकेतुन येऊन महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करुन त्यावर संशोधन करुन अमेरिका विद्यापिठात त्यांनी प्रबंध सादर करुन पीएचडी पदवी मिळवली.संताच्या अनेक साहित्याचे त्यांनी इंग्रजी मध्ये भाषांतर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर हे साहित्य पोहचविले.डाँ.भारत पाटणकर यांचेशी विवाह करुन त्या शलाका पाटणकर होऊन कायम भारतात राहिल्या.श्रमीक मुक्ती दलाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या.त्यांचे २५आँगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले .कासेगाव जि.सागली येथे बौध्द पध्दतीने त्यांचा अंत्यविधी पार पडला होता.
त्यांना श्रध्दाजली वाहणेसाठी पुण्यमोदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला सर्व उपस्थितानी त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर सामुहिक त्रिशरण ग्रहण करण्यात आले.
नंतर दोन मिनीट मौन बाळगुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.सिध्दार्थ जाधव यांनी सामुहिक विधी केला.
यावेळी संदीप मांडवे,(अध्यक्ष राष्टवादी काँग्रेस पंढरपुर -मंगळवेढा मतदार स़ंघ,)सिंध्दार्थ ढवळे (सर्व पत्रकार संघ) सुधाकर कवडे(कल्याणराव काळे)सुनिल वाघमारे(प्रबुद्ध परिवार)अंकुश शेंबडे(वंचित बहुजन आघाडी) बा.ना.धांडोरे(जेष्ठ साहित्यीक) द्यानेश्वर महाराज बंडगर(वारकरी सांप्रदाय) किरणराज घाडगे(संभाजी ब्रिगेड)मोहन अनपट(श्रमीक मुक्ती दल)
यांनी आपली मनोगते व्यक्त केली .शेवटी या शोकसभेचे अध्यक्ष सुनील सर्वगोड(राज्य संघटक,रिपाई ए) यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत लोंढे(सम्यक क्रांती मंच)यांनी केले.
यावेळी रवी सर्वगोड (बीएसपी जिल्हा सरचिटणीस)संतोष पवार(शहराध्यक्ष रिपाई ए)नवनाथ पोरे(पत्रकार)मोहन ढावरे(पत्रकार)श्रीकांत कसबे(पत्रकार) जेष्ठ कार्यकर्ते गौतम सरतापे,जे.के.गायकवाड़, प्रा.धैर्यशील भंडारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणकर, संजय सावंत (माजी शहराध्यक्ष, रिपाई ए)महेन्द्र जाधव(पिपल्स रिपब्लिकन पार्टी तालुकाध्यक्ष)स्वप्निल गायकवाड़ सोपान महाराज देशमुख यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close