जर्मनीतील भारतीय दूतावास जोडणार महाराष्ट्रातील 75 शाळा.
छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडी ता.पंढरपुर ची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जर्मनित रहाणार्या मराठी नागरिकांनी हाती घेतलेल्या ग्लोबल महाराष्ट्र उपक्रमात म्युनिक येथील भारतिय दुतावासाने व्हिडीओ काँन्फरन्सिंग द्वारे राज्यातील विवीध शाळेतिल सोबत संवाद साधला. या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहा हजार शाळांचे नोंदणी झालेली होती. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून आटपाडी एजुकेशन संस्थेचे छत्रपति शिवाजी विद्यालय मुंढेवाडी ता.पंढरपुर या एकमेव शाळेची निवड झाली आहे.
हा उपक्रम भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डाँ. सुयश चव्हाण व महाराष्ट्र मंडळ जर्मन यांनी विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिली. दैनिक सकाळ यांच्या माध्यमातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व तज्ञांना प्रश्न विचारले त्यांच्याशी संवाद साधला या उपक्रमांमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक भारत खिल्लारे सर ,दतात्रय कांबळे सर,विद्यार्थी ओंकार कसबे,अमन शेख,सुदर्शन शिंदे, सायली मोरे,दीक्षा मोरे,स्वाती घोडके यांचा सहभाग होता.विद्यार्थी पालक हितचिंतक यांनी सर्वांना प्रेरणा देण्याचे काम केले.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग नंतर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सुयश चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा आणि जर्मनीतील सुधारित इंग्रजी शाळा या दोघांमधला फरक स्पष्ट केला त्यानंतर जर्मनीमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केलेले आहे आपल्या भारतातील सर्व सण-उत्सव जर्मनीमध्ये साजरे कशा प्रकारे केले जातात याविषयी माहिती दिली.हा उपक्रम यापुढे प्रत्येक महिन्यातून एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृकता कालावधी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांना ऑनलाइनच्या माध्यमातून जर्मनी भाषेचे महत्व आणि जर्मनीमधील व्यवसायाच्या शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आँनलाईन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन अमरसिंह देशमुख व सचिव एच.यू.पवार व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले.