अधिकारांचा वापर उपेक्षितांच्या कल्याणासाठी करावा. — नरसिंग घोडके

अधिकारांचा वापर उपेक्षितांच्या कल्याणासाठी करावा.
— नरसिंग घोडके
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर — दलीत, आदिवासी, महिला आणि उपेक्षित समाजाला म.फुले यांनी शिक्षण दिले. राजर्षी शाहू राजांनी आरक्षण दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे संरक्षण दिले. त्यामुळे उपेक्षित समाजातील माणसांना आज पद आणि प्रतिष्ठा मिळत आहे. त्यांना आधिकार प्राप्त होत आहेत. या अधिकराचा वापर त्यांनी प्राधान्याने उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी वापर करावा. असे अवाहन ‘ लसाकम ‘ चे नियंत्रक नरसिंग घोडके यांनी केले आहे.
लातूर येथील ‘ लसाकम ‘ चे माजी सचिव गोरख गालफाडे यांचे सुपूत्र रोहन गालफाडे यांची एमपीएस्सी परीक्षेतून पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ या पदावर निवड झाल्याबद्दल ‘लसाकम ‘ च्या वतीने त्यांच्या माता – पित्यासह त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी नरसिंग घोडके बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इतिहास जसा प्रेरणा देतो तसा धडाही शिकवित असतो. याची सतत जाणीव ठेवूून जे लोक जीवन जगतात तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होत आसतात . यशस्वी होण्याचे हे सूत्र रोहन गालफाडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आपली वाटचाल करावी असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ‘ लसाकम ‘ चे महासचिव राजकुमार नामवाड यांचेही समायोचित भाषण झाले . नारायण कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमास ‘लसाकम ‘ चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे, सचिव मधुकर दुवे, लातूर तालूकाध्यक्ष राजेश तोगरे, शिरीष दिवेकर, प्रा.डॉ. गाडेकर, प्रा.गोविंद कलवले, इंजि. अतुल तोंडारे, श्यामसुंदर चव्हाण, राजेंद्र हजारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.



