वंचित बहुजन आघाडीचे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
ओबीसींना न्याय मिळावा या मागणीचे तहसीलदार यांना दिले निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- इतर मागासवर्गीय (ओबीसीं)ना लोकसंख्येच्या प्रमाणात ५२%आरक्षण देण्यात यावे,ओबीसीं विद्यार्थ्यांना जिल्हा व तालुकास्तरावर वस्तीगृह निर्माण केले पाहीजे,महाज्योती योजना चालू झाली पाहिजे,ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका यांचे वतिने तहसिल कार्यालय येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.विवीध मागण्याचे निवेदन अप्पर तहसीलदार घुटूकडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे,तालुकाध्यक्ष अंकूश शेंबडे,जिल्हाउपाध्यक्ष बिराप्पा मोटे,रवि सर्वगोड,शहर महासचिव सुनिल दंडाडे,तालुका महासचिव विनोद तोरणे,शहर युवकाध्यक्ष
डाँ.तुकाराम सावंत, शहर उपाध्यक्ष बबलू बोराळकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष लिंगेश्वर सरवदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अनेक सामाजिक संघटनेनी या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला.