पंढरीत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतिदिन साजरा
नगरसेवक संजय निंबाळकर यांनी वृद्ध मंडळींना दिला गोड भोजनाचा आस्वाद


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-भुकेल्यांचा जीव जाणारा, तहानल्यांची तहान भागवणारा आणि गरजवंताच्या मदतीस धावून जाणारा नेता म्हणून पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांची ख्याती होती. त्यांच्याकडे गेलेला कोणीही आनंदानेच माघारी परतायचा. अशा या नेत्याचा पाचवा स्मृतीदिन पंढरीत मोठ्या आदराने साजरा झाला.

यानिमित्ताने पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती संजय निंबाळकर यांनी वृद्ध मंडळींना गोड भोजनाचा आस्वाद दिला. गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात मोठी पंगत रंगली.
भगवान भाऊ लखेरी यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या या कार्यक्रमास विदुल अधटराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भाजपाचे अध्यक्ष लाला पानकर हे होते. याप्रसंगी श्रीकांत कसबे पत्रकार, रफिक अतार पत्रकार, अक्षय वाडकर, ज्ञानेश्वर सासवडे, धीरज म्हमाने, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, , सिकंदर बागवान, प्रशांत सुरवसे,, प्रशांत धुमाळ, अमोल धोत्रे, शिक्षण मंडळाचे बशीर भाई तांबोळी, गोलू लखेरी, मुकेश लखेरी, ऋषिकेश निंबाळकर, ओमकार चव्हाण, स्वप्निल चव्हाण यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक संजय निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.




