Uncategorized

थेट द्वितिय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

स्वेरीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा

छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे,स्वेरी चिन्ह व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये थेट द्वितिय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. मंगळवार दि. १३ जूलै २०२१ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि सदर प्रक्रिया सुरवातीला दि. ०४ ऑगस्ट २०२१ पर्यंत, त्यानंतर दि.११ ऑगस्ट २०२१ पर्यंत, पुन्हा त्यानंतर दि.२३ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु दरम्यानच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे व प्रमाणपत्रे आदी संबंधित बाबींची पूर्तता झाली नाही. ही बाब लक्षात आल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली असून विद्यार्थ्यांना आता सोमवार, दि.३० ऑगस्ट २०२१ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या वर्षी प्रथमच बारावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. आता विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त त्यांचा बारावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे तसेच ‘या प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या थेट द्वितिय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी थेट द्वितिय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १४ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची परंपरा या महाविद्यालयाने कायम राखली आहे. दि.३० ऑगस्ट पर्यंत असलेल्या या वाढीव मुदतीचा लाभ बारावी सायन्स, व्होकेशनल, एमसीव्हीसी आणि आय. टी. आय. मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. थेट द्वितिय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. प्रकाश कदम (मोबा.क्र.-९९२१०३०६६९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. या वर्षीही विद्यार्थी व पालक यांचेकडून स्वेरी डिप्लोमाच्या थेट द्वितिय वर्षाला पसंती व उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२१-२२ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close