स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.महेश मठपती यांना पीएच.डी. प्राप्त

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रा.डॉ. महेश मठपती.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा.महेश सिद्धारामय्या मठपती यांना नुकतीच अभियांत्रिकी मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या ‘स्टडी ऑफ फ्रॅक्ट्ल अँटेंना फॉर वायरलेस कम्युनिकेशन’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधनिबंध व्ही. टी. यु. बेळगाव (कर्नाटक) विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ.मोहम्मद बखर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. महेश मठपती यांनी पी.एच.डी. पूर्ण केली. त्यांना शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, डॉ. अनुप विभूते व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार या प्राध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. महेश मठपती यांनी आवर्जून सांगितले. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. महेश मठपती यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. महेश मठपती हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी हैद्राबाद, बेंगळूरू व चेन्नई मध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन संशोधन पेपर सादर केले आहेत तसेच स्प्रींजर, स्कोपस, एससीआय, आय ट्रीपल ई. व वेबाब सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून त्यांनी संशोधनपर पेपर प्रकाशित केले आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह स्वेरीचे इतर विश्वस्त व पदाधिकारी, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी तसेच गुरुनानकदेव इंजिनिअरींग कॉलेज, बिदर मधील प्राचार्य व शिक्षकांनी डॉ.मठपती यांचे अभिनंदन केले.



