ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी नेते संजय धाकु कोकरे यांच्या आदेशाने व ओबीसी युवा आघाडीचे मार्गदर्शक ऍड.उमेश टुमणे व ओबीसी महीला प्रदेशाध्यक्ष डाॅ.माधुरीताई पारपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी युवा आघाडी सोलापूर जिल्हा व ओबीसी युवा आघाडी पंढरपूर तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी जाहीर केल्या आहेत. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करीत आलेले ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थपाक संजय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राज्यात ओबीसी आघाडी कार्यरत आहे.ओबीसी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी पुढील वाटचाल आणखी गतिमान करण्यासाठी जिल्हा व तालुका ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती केली आहे.यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी रंगनाथ नाळे,जिल्हा संघटकपदी नागजी लोखंडे,जिल्हा सरचिटणीस पदी शमशाद तांबोळी,जिल्हा सचिवपदी अक्षय जाधव,पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सोमेश्वर हराळे,तालुका उपाध्यक्षपदी सारिका पवार,तालुका सरचिटणीसपदी अमीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. विविध ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करण्यासाठी ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत अशी अपेक्षा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी नियुक्तीचे पत्रे प्रदान करताना व्यक्त केली आहे.