Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्राने स्थगित

तहसीलदारांचे शिष्टमंडळ वायफळेमध्ये जाऊन केला सर्वे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या आंदोलकांना लेखी पत्र देताना नायब तहसीलदार नागेश गायकवाड, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे जिल्हाध्यक्षा सौ. पूनम फाळके ,प्रकाश फाळके ,सुनिता खटावकर बाळासाहेब चोपडे इत्यादी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज़ पोर्टल

श्रीकांत कसबे

तासगाव:-पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने वायफळे (ता. तासगाव) येथील वाढीव गावठाणातील 1037 गट नं. मधील विविध समस्यांबाबत 20 जुलैपासून आमरण उपोषण महिला आघाडीच्या वतीने चालू केले होते तासगावचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्याने स्थगित करण्यात आले असून, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे व तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

तासगाव- पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर लिंबू सरबत देऊन सोडण्यात आले यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व इतर
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ पुनम फाळके यांचे नेतृत्वाखाली 30 महिला आमरण उपोषणासाठी बसल्या होत्या पश्चिम महाराष्ट्रात एकाच वेळी तीच महिलांनी आमरण उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ होती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी “करो किंवा मरो” ही भूमिका घेतल्यामुळे व संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी टोकाचा लढा देण्याचा आदेश दिल्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
सदर उपोषण यशस्वी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.
आंदोलनामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब चोपडे, राज्य उपाध्यक्ष सौ.सुनिता खटावकर, युवकचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत लोंढे ,राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाश फाळके, राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जगन्नाथ सुवाशे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख लखन वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल बनसोडे ,वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कुमारी नयना लोंढे, युवती जिल्हा अध्यक्षा सौ. वनिता सोनवले, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, तासगाव तालुका अध्यक्ष भारत मोरे, किशोर कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close