Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी विठ्ठल चौगुले यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कोल्हापूर :- केनवडे (ता.कागल )पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी केनवडे येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय विठ्ठल चौगुले याना नुकतेच निवडीचे पत्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी दिले. विठ्ठल चौगुले हे गेली दहा वर्षे सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील तळागाळात जाऊन न्याय देण्याचे काम करीत आहेत .निवडीनंतर बोलताना विठ्ठल चौगुले म्हणाले पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला बळ आले असून भविष्यामध्ये राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संघटनेच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक राहून करेन.



