तीस-पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेची सत्ता ताब्यात असुन शहराचा परिचारकांनी काय विकास केला?
मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा सवाल

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) गेली तीस-पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेची सत्ता परिचारक गटाकडे असून देखील पंढरपूर शहरासाठी काय विकास केला ? असा सवाल मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
शहरातील रस्ते, ड्रेनेज लाईन तसेच उपनगरातील रस्ते अद्यापही खड्डेमय अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यासाठी आंदोलन करणारे माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या साठी तसेच आपल्या घरासमोरील जाणाऱ्या प्रदर्शना मार्गावरील रस्त्याचे साठी कधी आंदोलन करणार? परिचारक गटाच्या विरुद्ध आम्ही अन्य विरोधी पक्षातील लोकांना सोबत घेऊन येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये परिचारक गटाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच काल रोजी माझ्यावर आरोप करण्यात आला की मी साधी नगरपालिकेच्या निवडणुकीला निवडून येऊ शकत नाही. ते विरोधी गट कसा तयार करेल आणि निवडून येईल असे वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केले होते. आम्ही त्यांना सांगू इच्छितो मी कधीही नगरपालिकेची निवडणूक लढवलेली नाही. जनतेची परिचारक हे दिशाभूल करीत आहे. हे लक्षण म्हणजे त्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागलेली आहे. हेच दिसून येते. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे ते काहीही बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. हेच दिसून येते. परिचारक यांना जनतेने दोन वेळा विधानसभेला नाकारले आहे. येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील जनता परिचारक गटाला नाकारणार आहे. हे दिसून आल्यामुळे ते काहीही बोलत सुटले आहेत . परिचारक यांचे आता असेदेखील म्हणणे आहे. कि पंढरपूर नगरपालिकेशी माझे काही घेणेदेणे नाही. परिचारिकांचे असे बोलणे हे पंढरपूरकरांची केलेली क्रुर थट्टा आहे. गेली 35 वर्ष जनतेने परिचारक गटाला बहुमताने निवडून दिले. आज हेच परिचारक पंढरपूर नगरपालिके शी काही घेणेदेणे नाही.असे बोलू लागले आहेत.
परिचारक गटांनी पंढरपूर शहराचा विकास नव्हे तर पंढरपूर शहर भक्कास, आणि बकाल करून ठेवले आहे. असाही आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
या पत्रकार परिषदेस नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे कोळी समाज संघटनेचे नेते अरुण कोळी, जयवंत भोसले,बंदपट्टे आधी विरोधी गटातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.