Uncategorized

पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी डॉ. प्रशांत जाधव यांनी कार्यभार स्वीकारला

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने मावळते मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा निरोप समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहा. आयुक्त डॉ. प्रशांत जाधव यांनी आज पंढरपूर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारला यानिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखच्या वतीने नूतन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांचा सत्कार उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते करण्यात आला,

तसेच पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने  मावळते मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा निरोप समारंभ संपन्न झाला

यावेळी नगर अभियंता प्रवीण बैले,नेताजी पवार.अभियंता सोमेश धट,सुहास झिंगे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, पाणी पुरवठा अभियंता राजकुमार काळे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, मुख्य लेखापाल अभिलाषा नेरे, बाजीराव जाधव, चिदानंद सर्वगोड,गणेश धारूरकर,अनिल अभंगराव, राहुल शिंगाडे, कृष्णात जगताप,प्रीतम येळे,संतोष शिरसागर, ऋषी अधटराव,संजय माने,संतोष कसबे,योगेश काळे,तनुजा सीताप, पराग डोंगरे हे उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close