Uncategorized

कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना घेरावा घालणार पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देताना शिरोळ तालुका अध्यक्षा साबेरा इंगळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

कुरुंदवाड:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने शिरोळ तालुका अध्यक्षा साबेरा इंगळे यांचे नेतृत्व खालील महिलांच्या शिष्टमंडळाने तोडकर गल्ली क्रमांक एक, दोन व तीन या तीनही गल्ल्यांच्या मध्ये गेले अनेक दिवसापासून कमी दाबाने पिण्याचे पाणी येत असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सदर गल्लीमध्ये मुख्य पाईप लाईन मधून पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करून देखील सदर अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतअसल्यामुळे व आलेल्या शिष्टमंडळातील कोण निवडणुकीला उभा राहणार असल्याचा प्रश्न विचारून मुख्य प्रश्नांची टिंगल करत आहेत.
सदर बाब गंभीर असून तोडकर गल्लीत जास्त दाबाने पाणीपुरवठा येत्या दहा दिवसात न झाल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना घेराव घालणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्षा साबेरा इंगळे यांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close