पोलीस प्रशासन सदैव पोलीस कर्मचार्यांच्या पाठिशी ः पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते
श्री विठ्ठल पोलिस सहकारी गृह निर्माण सोसायटी भुमीपुजन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर ः हार्डवर्क व समाजासाठी रक्ताचे पाणी करत सतत सेवेसाठी तत्पर असणार्या पोलीस कर्मचार्यांच्या पाठिशी तेवढ्याच ठामपणे पोलीस प्रशासन उभे राहत असल्याचे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले .त्या श्री.विठ्ठल पोलीस सह. गृहनिर्माण सोसायटीच्या भुमिपुजन समारंभा प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,तहसिलदार सुशिल बेल्हेकर,पोलीस निरिक्षक किरण अवचर,राजेश देवरे,प्रशांत भस्मे,अरुण पवार ,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.
ना नफा ना तोटा या तत्वावर पोलीस कर्मचार्यांसाठी बांधल्या जात असलेल्या या गृहनिर्माण सोसायटीचा भुमिपुजन समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या सोसायटीसाठी प्रयत्न करणारे वामन यलमार,गजानन माळी,विशाल शिंदे यांचे अभिनंदन करुन या प्रकल्पाच्या गृहप्रवेशास मी हजर राहणार असल्याचे सांगितले .पारदर्शकता हे शिवधनुष्य असल्याने पोलीस कर्मचार्यांच्या या स्वप्नातील घराला त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी या प्रकल्पाचा आदर्श इतर खात्यातील कर्मचार्यांनी घेण्याचे अवाहन केले.यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,प्रास्ताविक प्रशांत वाघमारे यांनी तर सुत्रसंचलन यशपालजी खेडेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वामन यलमार,गजानन माळी,विशाल शिंदे व सर्व संचालक मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.