गोसावी परिवारानी कर्मकांडाला मुठमाती देऊन पार पाडला लग्नसोहळा…..

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- कासेगाव येथील शेतमळ्यात गोसावी परिवारांचा लग्न सोहळा भटजी व कर्मकांड याला फाटा देऊन , नवदांपत्यांनी महापुरुषांच्या प्रतीमेला अभिवादन करुन त्यांनी दिलेल्या वैज्ञानिक मार्गाने जाण्याचा संकल्प करुन संपन्न झाला. येथील सेवागिरी गोसावी यांचे सुपुत्र अक्षय {(M.A.M.A.B.) व शंकर गोसावी पुणे यांची कन्या शिवानी(Bsc,नर्सिंग) यांचा विवाह गादेगाव येथील तुकाराम बागल यांनी लावला.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,डाँ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला वरवधूने अभिवादन केले.सत्यशोधकी व शिवधर्मीय मंगलाष्टिका म्हणण्यात येऊन वरवधु यांचेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सेवागिरी गोसावी हे गेली तिस वर्ष फुले-आंबेडकरी चळवळीत कार्यरत असुन बामसेफ, इनसाफ,प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी,वंचित बहुजन आघाडी या संघटनेत विवीध पदे त्यांनी भुषवली असुन त्यांचे कुटुंब हे बुध्दाचे तत्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात..धम्माच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न या विवाहाच्या निमित्ताने झाला आहे.कोरोना चे नियम पाळून संपन्न झालेल्या या विवाह प्रसंगी कुमार गोसावी, गजानन गोसावी ,संतोष गिरी,धनंजय गिरी,वंचित बहुजन आघाडीचे माजी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे,प्रा.धैर्यशील भंडारे,प्रा.बि.के.लोखंडे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.