२०१९ पासून पोलीस भरती परीक्षेत केलेला बदल रद्द करून २०१९ पूर्वी प्रमाणे परीक्षा घ्याव्यात या मागणीचे तहसीलदारांना निवेदन
...अन्यथा तिव्र आंदोलनाचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा

जोशाबा टाईम्स वेब न न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कराड:-महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना अन्यायाच्या विरोधात लढा देत असून आज सातारा जिल्हाअध्यक्ष विद्यार्थी (आघाडी) आकाश नेटके यांचे नेतृत्वाखाली पोलीस भरती संबंधातील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.दिलीप वळेसे पाटील यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले असून ते तात्काळ त्यांना पाठवून सदरच्या मागण्या मान्य करून घेण्यात याव्यात. अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कराड तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनामार्फत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे१)२०१९ चेपूर्वी प्रमाणे पोलिस भरतीतील मैदानी परीक्षा १०० मार्काची अगोदर घेऊन नंतर 100 मार्काची लेखी परीक्षा घ्यावी.२) 2019 नंतर 100 मार्काची लेखी परीक्षा अगोदर व नंतर 50 मार्काची मैदानी परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे ती तात्काळ रद्द करून ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांच्या वर होणारा अन्याय दूर करावा.
३) 100 मार्काची लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कसलेही मार्गदर्शन करणारे क्लासेस नसल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना जाणून बुजून लेखी परीक्षा अगोदर घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत बाजूला केल्याचे लक्षात येत आहे तसे करू नये.
४) शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थी शारीरिक मेहनत करून मैदानी परीक्षेत सक्षम झालेले असतात त्यामुळे मैदानी परीक्षा अगोदर 100 मार्काची घ्यावी व नंतर 100 मार्कची लेखी परीक्षा घेण्याची पद्धत योग्य आहे हीच ठेवावी.
५) लेखी परीक्षा अगोदर घेऊन ग्रामीण उमेदवारांच्या वर जाणून-बुजून अन्याय केला जात आहे तो कदापि सहन केला जाणार नाही या निवेदनावर १) आकाश नेटके सातारा जिल्हाअध्यक्ष विद्यार्थी (आघाडी) पुरोगामी संघर्ष परिषद
२) बाळासाहेब साठे प्रदेशअध्यक्ष पुरोगामी संघर्ष परीषद (महाराष्ट्र राज्य)
३) सुभाष साळुंखे पुरोगामी संघर्ष परिषद (महाराष्ट्र राज्य ) पश्चिम महाराष्ट्र वरिष्ठ संघटक
४) तुषार साठे पुरोगामी संघर्ष परिषद (महाराष्ट्र राज्य) शाखाप्रमुख
५) विनोद साठे (शाखा कार्यअध्यक्ष)
६)सुनिल साठे (शाखा सहसचिव) यांच्या सह्या आहेत.