मराठा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो:नरेन्द्र पाटिल
आरक्षणाबाबत आयोजित केलेल्या मराठा समाज बैठकीत व्यक्त केली भुमिका

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-मराठा समाजाला फडणवीस सरकारने आरक्षण दिले.आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडल ,विद्ययार्थ्यासाठी वस्तीगृह निर्मीती केली.आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यानी लाभ घेतला. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले.पण महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने टिकले नाही.असे भुमिका आण्णासाहेब पाटील महामंडलाचे अध्यक्ष नरेन्द्र पाटील यांनी व्यक्त केले.
विवीध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी मराठा समाज म्हणून मराठा आरक्षण बाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी तनपुरे महाराज मठात एकत्र आले होते.याप्रसंगी नरेन्द्र पाटील बोलत होते.या बैठकीत आ.समाधान आवताडे,संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे,अमरजीत पाटील, राष्टवादी काँग्रेसचे संदीप मांडवे,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, पांडुरंग सह.साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्राचार्य बी.पी.रोंगे सर पंचायत समिति सदस्य प्रशांंत देशमुख, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी वार्तालाप करताना नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तालुका, जिल्हा लेव्हलवर आक्रमक आंदोलन करणार असल्याचे सांगुन संभाजीराजे छत्रपती व आमच्यात मतभेद नाहीत .ते शांततेने मोर्चा काढणार आहेत. मुकमोर्चा निघाला होता तेव्हा ही असे अनेक संघटनेचे आंदोलने झाली होती असे त्यांनी स्पष्ट केले.एकंदरीत याबैठकीचा सुर पहाता भाजप प्रणीत आंदोलनाची जबाबदारी आ.नरेन्द्र पाटील यांचे खांद्यावर दिली असल्याची चर्चा याठिकाणी दिसुन आली.