तावशी येथे लोकसहभागातून व स्वेरीच्या सौजन्याने उभारले ‘कोविड केअर सेंटर
समविचारी युवकांनी पुढाकार घेऊन केली कौतुकास्पद कामगिरी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे’
पंढरपूर- कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने तावशी (ता. पंढरपूर) येथे आज मंगळवार दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता लोकसहभागातून आणि स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर यांच्या सहकार्याने ५० बेडच्या ‘कोविड केअर सेंटर’चे उदघाटन करण्यात आले. यामुळे तावशी व परिसरातील रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे.
पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून उपचारासाठी रुग्णांची धावपळ होऊ नये आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी तावशी मध्ये हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले असून यातून तावशी मधील रुग्णांना उपचाराची सोय होणार आहे. याप्रसंगी तहसीलदार सुशिल वेल्लेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील, स्वेरी कॅम्पस चे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, जेष्ठ समाजसेवक बाळासाहेब यादव, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, सरपंच गणपत यादव, उपसरपंच अमोल कुंभार, , तलाठी मुकुंद घोगरदरे, सर्कल अधिकारी मोरे यांची प्रमुुख उपस्थिती होती.
या सेंटरमध्ये पन्नास कोरोना रुग्णांची आयसोलेशनची (विलगीकरण) व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष व महिला वॉर्ड वेगवेगळा उभारण्यात आला आहे. येथे दाखल होणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी तसेच गावातील तीन डॉक्टर डॉ गायकवाड, डॉ. माने, डॉ.लवटे सहकार्य करणार आहेत. .
लोकसहभागातून विविध घटकांच्या वतीने सर्व रुग्णांना शुद्ध पाणी, चहा, काढा, आवश्यकतेनुसार सकाळी नाष्टा देण्यात येणार आहे. तसेच गरम पाणी, रुग्णवाहिका यांचीही
तसेच कोविड सेंटर उभारण्यासाठी मोलाचे योगदान देणारे बाळासाहेब यादव, अनिल यादव,, अनिल वगरे, काकासो सूर्यवंशी, तात्यासाहेब यादव, रवी रणदिवे, कृष्णा मासाळ, संभाजी यादव, सलीम मुलाणी, हनुमंत आसबे, संजय शिंदे, दिनेश यादव, नितिन कांबळे, शंकर यादव, विजय शिंगण, बाळासो क्षीरसागर, ट्रॅक्टर चालक-मालक संघटना तावशी, तालीम चौक मित्रमंडळ , व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर्स, व
ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.




