.कासेगाव हद्दीत एम.आय.डी.सी.उभी करण्यास शेतकर्याचा विरोध
कृषी क्षेत्र धोक्यात येऊन आर्थिक उद्योग अडचणीत येणार असल्याने विरोध

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-दोनच दिवसापुर्वी आ.समाधान आवताडे मा.आमदार प्रशांतराव परिचारक,मनसेचे नेते दिलीप धोत्रे व शासकिय अधिकारी यांनी एम.आय.डी.सी.साठी जागेची पहाणी केली होती.कासेगाव हद्दीतील शेतकर्यांना न विचारता येथील जागेची पहाणी केली आहे.ती अन्यायकारक असून द्राक्ष,डाळींब,उस याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे .ओद्योगीक व्यवसाय येथे आले तर जमीनीवर परिणाम होणार असुन कामगारावर परिणाम होईल व वार्षिक ९००ते१०००कोटीची उलाढाल होते त्यावर परिणाम होणार असल्याने दोन्ही आमदारानी हा प्रोजेक्ट कासेगाव सोडून अन्य ठिकाणी करावा अशी मागणी प्रशांत देशमुख माजी उपसभापती पंचायत समीती यांनी पत्रकार परिषद मध्ये केली.यावेळी राष्टवादी काँंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, काँंग्रेस आय तालुकाध्यक्ष अमरजीत पाटिल, अमोल खिलारे ,तालुकाध्यक्ष राष्टवादी सामाजिक न्याय विभाग भास्कर मोरे,माजी जिप सदस्य हरिभाऊ गावंदरे,व शेतकरी उपस्थीत होते.आमची मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.