उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्यायअत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून सरकारचा जाहीर निषेध…
...

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला
यावेळी गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहेर करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षेत वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी या संदर्भात आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष संदीपदादा मांडवे,महिला तालुकाध्यक्षा राजश्रीताई ताड, शहराध्यक्षा सुनंदा उमाटे, सोमनाथ गोरे, दत्तात्रेय माने, नवनाथ मोरे, मनीष पवार, अमोल खिलारे, संजय शिंदे, विजय गायकवाड, अभिजीत कवडे व अनेक महिला भगिनींनी महाराष्ट्रातल्या या काम चुकार व कुचकामी सरकारचा निषेध केला.