Uncategorized

कर्मवीर महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

1) यश दोडिया 2) संस्कार रवी दोडिया 3) सुमेध महेश बंगाळे 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे  

पंढरपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या संस्कार रवी दोडिया, सुमेध महेश बंगाळे व यश गुरु दोडिया या तीन युवा खेळाडूंची राज्यस्तरीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा राहुरी येथे संपन्न होणार असून, या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवाला गेला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या तिन्ही खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, तसेच प्रा. विठ्ठल काटकर यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महाविद्यालयातील विविध विभागांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर सेवकवर्ग यांनीही खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले, प्रा. अनिल परमार, प्रा.उमेश साळुंखे व ओंकार नेहतराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व मान्यवरांनी या युवा खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे, पंढरपूर शहराचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीमुळे संस्कार रवी दोडिया, सुमेध बंगाळे व यश गुरु दोडिया यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close