ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत नाथन केंगार व गौतम सरतापे यांना विविध संघटनेच्या वतीने श्रद्धांजली!


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर =- फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बामसेफचे सदस्य व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी दिवंगत नाथन केंगार व गौतम सरतापे यांचे अपघाती निधन झाले होते. चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

1) एल.एस.सोनकांबळे 2) आर.डी.चंदनशिवे 3) सुनील वाघमारे4) डॉ. सिकंदर ढवळे आपल्या भावना व्यक्त करताना

1) बा. ना. धांडोरे 2)आर.पी. कांबळे 3) किशोर बनसोडे 4)बापूसाहेब ठोकळे….आपल्या भावना व्यक्त करताना

1)बाळासाहेब बनसोडे 2) प्रा. शिवाजीराव वाघमारे 3)भालचंद्र कांबळे 4)जैनुद्दीन मुलाणी…आपल्या भावना व्यक्त करताना
यावेळी जैनुद्दीन मुलाणी संपादक युवा राष्ट्र चेतना , आर.डी चंदनशिवे बामसेफ ची माजी अध्यक्ष , ज्येष्ठ साहित्य बा. ना. धांडोरे, भालचंद्र कांबळे बसपा जिल्हाध्यक्ष ,सुनील वाघमारे (अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंच) , बाळासाहेब बनसोडे सांगोला, किशोर बनसोडे (माजी नगरसेवक सांगोला), बापूसाहेब ठोकळे सागोला, प्रा. शिवाजीराव वाघमारे( ज्येष्ठ साहित्यिक ) आर. पी कांबळे, (अध्यक्ष पंचशील मंडळ) यांनी आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली अर्पण केली.

यावेळी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर बंगाळे, राजू बनसोडे , किरण कांबळे, सतीश तुपारे, राजेंद्र केंगार, आनंद लोंढे,प्रमोद बाबर, गुरु दोडिया यांचे सह त्यांचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एल. एस. सोनकांबळे (बामसेफचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष) होते प्रास्ताविक श्रीकांत कसबे यांनी केले तर सूत्रसंचालन दादासाहेब दोडके सर यांनी केले.
कार्यक्रमास सुरुवातीस दिवंगत नाथन केंगार व गौतम सरतापे यांचे प्रतिमेस अभिवादन करून त्रीशरण व पंचशील घेण्यात आले.




