Uncategorized

श्री विठ्ठलवर माजी उपप्रधानमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांची  पुण्यतिथी साजरी  

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

वेणुनगर, दि.२५- वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै.यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याची विधी होत त्यांच्या पुतळ्याची विधिवत  पुजा जेष्ठ संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांचे शुभहस्ते व चेअरमन आमदार श्री अभिजीत(आबा) पाटील व संचालक मंडळाच्या वतीने  करण्यात आले.

कै. यशवंतराव चव्हाण साहेब  यांचा श्री विठ्ठल सह. कारखाना उभा करण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या प्रयत्नात यश येऊन गुरसाळे  येथील माळरानावर   श्री विठ्ठल कारखान्याची  मुहूर्तमेढ  रोवून पंढरपूर येथील कृषी व औद्योगिक भूमी उभारली. कै. यशवंतराव साहेब साहेब हे दुरदर्शी व प्रगल्भ विचारसरणी आणि विकासाला आयुष्य समर्पित करणारे महाराष्ट्राचे सामाजीक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक  क्षेत्रात परिवर्तनाची नवी दिशा देणारे  दुरदृष्टी विचार  होते. आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतरावजी  चव्हाण  होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण  कशासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न हीच त्यांची खरी ओळख आहे.

सदर कार्यक्रमास धनंजय काळे,, दत्ताय नरसाळे, सचिन पाटील, गणेश ननवरे, कार्यकारी अधिकारी श्री डी. आर. गायकवाड, तसेच कारखान्याचे  सभासद,  कार्यकर्ते , ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग हितचिंतक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी कै.. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहुन विनम्र आभिवादन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close