विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील निवड प्रक्रियेत उपप्राचार्य पदी प्रा डॉ. अरुण कांबळे यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कळंब:-इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची कळंब येथील महाविद्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीसाठी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,कुलदीप हेगडे , विरबाला पाटील आदी विश्वस्तांच्या झालेल्या सभेत संस्थेच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी एकमताने प्रा डॉ.अरुण मारुती कांबळे यांची निवड करण्यात आल्याचे संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.
प्रा.अरुण कांबळे यांची उपप्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते अरुण कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अरुण कांबळे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ अंकुश आहेर ,विज्ञान विभाग प्रमुख प्रा डॉ तेजश्री हुंबे, प्रा.डॉ विलास बुवा,प्रा.डॉ. सुहास भैरट ,प्रा.डॉ. विजय केसकर,प्रा.डॉ. रामचंद्र पाखरे,प्रा. प्रशांत शिंदे,राजेंद्रकुमार डांगे,जोत्सना गायकवाड, रविराज शिंदे ,ज्ञानेश्वर गुळीग ,ग्रंथपाल विनायक शिंदे आदी मान्यवर व कला, वाणिज्य ,विज्ञान शाखेचे प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.