Uncategorized

पंढरपूर नगरपालिका निवडणूक चित्र आज स्पष्ट होणार!

माजी आ.प्रशांतराव परिचारक व आ. अभिजित पाटील यांचेवर दबाव

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदा साठी उमेदवारी अर्ज भरण्याचे दोनच दिवस शिल्लक आहेत. तरीही विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवार यांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. माजी आमदार प्रशांतराव परिचारक पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा असून काही कालावधी वगळता पंढरपूर नगरपरिषद हे त्यांच्यात ताब्यात आहे. प्रत्येक निवडणूक ते पंढरपूर शहर सुधारणा आघाडी या नावाने लढवीत असतात. त्याचे अध्यक्ष उमेशराव परिचारक आहेत . त्यांनी त्यांच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना निवडणूक चिन्ह कमळ घेऊनच निवडणुका लढण्यात सांगितले आहे. माजी आमदार राम सातपुते पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे यांनी याबाबतीत माजी आ.प्रशांतराव परिचारक  यांचेवर दबाव आणल्याचे समजते. जर कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तर काही भागात भाजपला निश्चितच फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशांतराव परिचारक हे सावधगिरीने पावले उचलत आहेत. त्यामुळे अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. तिकडे आमदार अभिजीत पाटील यांनी  व अनिलदादा सावंत, दिलीपबापू धोत्रे,, कल्याणराव  काळे, भगीरथदादा भालके, नागेश भोसले  यांनी विठ्ठल परिवार एक संघ करण्याचा प्रयत्न केला. व त्याला यशही आले. विठ्ठल परिवार(तीर्थक्षेत्र विकास आघाडी)कडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रणितीताई भगीरथ भालके यांचे नाव पुढे आले. त्यामुळे या गटातून इच्छुक उमेदवार सौ साधनाताई नागेश भोसले या गटातून बाहेर पडून भाजपकडून उमेदवारी मागितली. परंतु त्यांना अद्याप होकार मिळालेला नाही. अनिलदादा सावंत व भागीरथदादा भालके यांनीही इच्छुक उमेदवाराच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या आहेत. पण त्यांनी उमेदवार जाहीर केले नाहीत.परिचारक गटाकडून सौ शामलताई शिरसाट व सौ स्मिताताई अधटराव यापैकी एक नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित होईल असे वाटते. याच वातावरणात अभिजीत पाटील यांना तिसरी आघाडी काढून निवडणूक लढवण्याचा दबाव येत असल्याचे समजते. त्यामुळे येणारी निवडणूक दुरंगी होणे ऐवजी तिरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  उद्या निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.  निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी होणार , परिचारक गट संपूर्ण निवडणूक कमळ चिन्हावर लढविणार  कीं आघाडी करणार . वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी कोणाची उमेदवाऱी जाहीर करणार  रिपाई ला किती जागा मिळणार हे आज स्पष्ट होईल असे वाटते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close