जातीअंताच्या लढाई शिवाय संविधाननिष्ठ राष्ट्र बनणे अशक्य…– डॉ. अनंत राऊत.
फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच आटपाडी व्याख्यानमाला ३ रे पुष्प

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
डाँ.रामदास नाईकनवरे सांगली जिल्हा प्रतिनिधी
आटपाडी :-२२/११/२०२२
स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ,वैज्ञानिक दृष्टीकोन , सहकार इ. संविधानिक मूल्ये धाग्यामध्ये राष्ट्राची गुंफण करून विषमता, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, वंशभेद, अंधश्रद्धा इ. असंविधनिक मूल्यांना नष्ट करून सर्व भारतीयांनी भारतीय संविधानावर निष्ठा ठेवून भारत हे एकजीव राष्ट्र बनवावे. कारण त्याशिवाय संविधानिक राष्ट्र बनविणे अशक्य आहे. असे मत प्रा.डॉ.अनंत राऊत यांनी फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते” संविधाननिष्ठ राष्ट्रवादाचे स्वरूप” या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जे संविधान संबंध मानवी जीवनाच्या प्रागतिक राष्ट्रवादाची मांडणी करते आणि नैसर्गिक सत्याला जवळ करते. ते संविधान जगाच्या पाठीवर सर्वोत्तम असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानाची उभारणी ही संविधानिक मुल्ये असणा-या धाग्यामध्ये केलेली असून मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच असेन ही धारणा त्यांनी संबंध भारतीय समाज जीवनाला दान दिली. त्यामुळे भारतीय समाज जीवनातील सर्व संकुचित अस्मितांना डॉ.आंबेडकर यांनी मुठमाती दिली. म्हणूनच आजच्या भारतीय संविधानामध्ये संविधाननिष्ठ राष्ट्र बनविण्याची खुप मोठी ताकत आहे. असेही त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.
याशिवाय संविधानिक राष्ट्रवादामध्ये देशाच्या सिमेवरती रक्षण करणारे फौजी, कायदे बनविणारी संसद , देशाचा प्रधानमंत्री , देशाचा राष्ट्रपती , सर्वोच्च न्यायालय , रिझर्व्ह बँक , मुद्रा, चलन, प्रशासन व्यवस्था , निवडणूक आयोग आणि एकसमान सण महोत्सव इ. महत्वाच्या गोष्टी संविधाननिष्ठ राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे संविधाननिष्ठ राष्ट्र बनविताना सरंजामशाहीची मानसिकता झुगारून देणे, तिर्थ स्थानांची संविधान संस्कृती निर्माण करणे. व सण महोत्सव संविधाननिष्ठ बनविणे यासर्व गोष्टी संविधाननिष्ठ राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये अत्यंत महत्वाच्या असतात. असे महत्वपुर्ण विचार डॉ.यांनी यावेळी मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.उत्तम मोटे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधाननिष्ठ राष्ट्रउभारणीसाठी सिध्दार्थ गौतम बुध्दांची समतावादी विचारसरणीच देशाला उपयोगी पडेल. असे महत्वपुर्ण विचार त्यांनी आपल्या मनोगतात मांडले.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षीय भाषण फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष व रिपाईंचे जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संताजी देशमुख यांनी केले असून , सुत्रसंचालन गणेश ऐवळेसर तर आभार पुजा मोटे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण मोटे, प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , धनंजय वाघमारे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , नामदेव खरात , भिमराव कदम, अक्षय बनसोडे , किरण जावीर , शाम ऐवळेसर , सुनिल ऐवळे जिल्हा संघटक विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे , भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर , जयश्री नामदेव खरात, जानता दुर्योधन खरात , प्रियांका विवेकानंद खरचे यांच्यासह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.



