गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याची मागणी करणार :ना. रामदास आठवले
स्वराज्य संस्था निवडणुकीत रिपाईला सत्तेचा वाटा मागणार

पंढरपूर :- भाकड जनावरांचा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला असून अशी जनावरे विनाकारण सांभाळण्याची पाळी शेतकऱ्यावर आलेले असून गोहत्या बंदीचा कायदा राहिला पाहिजे परंतु गोवंश हत्या बंदी कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केली असून ही मागणी अत्यंत योग्य आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित बंद झाला पाहिजे अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे करणार आहोत अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. आज पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर विश्राम गृह येथे ते पत्रकाराशी संवाद साधत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेला मत चोरी प्रकाराचा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे. या विरोधात वातावरण निर्माण करण्यापेक्षा निवडणूक आयोगाची समक्ष भेटून पुरावे दिले पाहिजेत. पावसाळी अधिवेशनात विरोधकानी गोंधळ घालून कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे अनेक निर्णय घेता आले नाहीत. व मोठी आर्थिक हानी झाली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पी.सी राधाकृष्णन हे आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका, पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला सत्तेचा वाटा मिळेल व तो मिळावा यासाठी प्रयत्न करणाआहे.. विधान परिषद राज्यमंत्रीपद आणि महामंडळ याबाबत बोलताना म्हणाले की तीन पक्षाचे सरकार असून त्याला आमच्या चौथ्या पक्षाचा पाठिंबा आहे. तरीही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असे वाटते. त्यांना विजयी करण्यात आमचाही वाटा आहे. आमचे सोबत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे. महामंडळे जाहीर झाली की निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांना पदे मिळतील. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत ना.आठवले म्हणाले की, 29 ऑगस्टला त्यांचा मुंबईमध्ये मोर्चा आहे. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठ्यांनी घेतला पाहिजे. ज्यांना कुणबी जातीचे दाखले मिळालेले आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्यास काही हरकत नसावी.
त्यांना न्याय देताना ओबीसीवर अन्याय व्हायला नको अशी आमची भूमिका आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे. वेळ कमी आहे तरी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
या पत्रकार परिषदेच्या वेळी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य संघटक सुनील सर्वगोड, प.महाराष्ट्र संघटक बाळासाहेब कसबे पश्चिम महाराष्ट्र सचिव आप्पासाहेब जाधव, महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र बनसोडे,, रिपाई नेते नंदकुमार साळवे, बाळासाहेब साखरे, कुमार भोसले, विजय वाघमारे आधी उपस्थित होते.शहराध्यक्ष ऍड. कीर्तीपाल सर्वगोड यांनी स्वागत केले. आभार सोमनाथ भोसले यांनी मानले.




