स्वातंत्र्यदिनी रिक्षाचालकांना सीएनजी गॅसचे मोफत वाटप
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर सातपुते यांचा उपक्रम


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार , स्थितप्रज्ञ राजकारणी आणि ज्यांच्याकडे पंढरपूर शहराचा चेहरा म्हणून पाहिलं जात , अशा प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यात जोरदार साजरा केला जातोय. यानिमित्ताने अनेक सार्वजनिक उपक्रम राबविले जात आहेत. गोकुळाष्टमी दिनी परिचारक यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, संत पेठ परिसरातील रामेश्वर सातपुते यांनी शहरातील रिक्षाचालकांना मोफत सीएनजी वाटप केले.
स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा उपक्रम, दुपारी दोन वाजता बंद झाला. यामुळे येथील रिक्षा चालकांनी त्यांचे मोठे आभार मानले.

समाजसेवक रामेश्वर सातपुते यांनी , रिक्षाचालकांनी माफक दरात भाविकांना रिक्षा भाडे आकारावे , आणि यातून
विठुरायाची सेवा व्हावी , असे मत यावेळी व्यक्त केले.
या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन युटोपियन शुगरचे चेअरमन , रिक्षा चालक मालक संघटनेचे नेते उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, समाजसेवक रामेश्वर सातपुते , माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, इस्माईल बोहरी, नगरसेवक माजी संजय निंबाळकर, माजी नगरसेवक राजू सर्वगोड,कामगार नेते नानासाहेब वाघमारे, कृ. उ. बा. स. संचालक सिकंदर बागवान, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे नगरसेवक बजरंग देवमारे, न. पा. शि. मं. माजी सभापती बशीर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते अशोक (पिंटू)शिंदे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी सांगितले की,रामेश्वर सातपुते यांनी अगदी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.पंढरी नगरीत रिक्षा व्यवसाय हजारो युवकांचा व्यवसाय आहे. येथील हजारो रिक्षाचालक दररोज भाविकांची सेवा करत असतात.यावरच त्यांची रोजी रोटी चालते.रिक्षाचालकांना मोफत गॅस वाटप करून , सातपुते यांनी भाविकांची ही एकप्रकारे सेवा केली आहे. याप्रसंगी ,लाला शेख (पेंटर), उमेश सर्वगोड, शैलेश आगावणे, अण्णा धोत्रे, महेश सातपुते, संजय धुमाळ, जयदीप माने, प्रशांत सुरवसे, नंदू रावताळे, यांच्यासह बहुसंख्या परिचारक प्रेमी नागरिक उपस्थित होते.



