समाजाच्या शासकीय योजना साठी अधिकाऱ्याना धारेवर धरा- प्रा.सुभाष वायदंडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- मागासवर्गीयांच्या विकासासाठी ज्या शासकीय योजना आहेत त्याच्यामध्ये मातंग समाजासाठी ज्या काही मोजक्या शासकीय योजना आहेत त्या योजना समाजाचा विकास होण्याच्या दृष्टीने राबवल्या जात नाहीत अशी चिंता व्यक्त करून यासाठी जे काही अधिकारी जबाबदार असतील अशा अधिकाऱ्यांना वेळप्रसंगी कार्यालयात घुसून धारेवर धरा असा टोकाचा सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला ते सातारा येथे संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते .
प्रा. वायदंडे बोलताना पुढे म्हणाले आज पर्यंत शासनाने दिलेला मागासवर्गीय निधी जिल्हास्तरावर योजना राबवल्या नसल्यामुळे तो परत पाठवला जातोय कामचुकार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून समाजाचा विकास थांबवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून समाजाच्या विकासाआड येणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवण्याचा सल्ला दिला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रतन लोखंडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अंकुश (भाऊ) भोंडे, पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस सौ छायाताई मोरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख श्रीमती शोभा पारधे ,सांगली जिल्हा अध्यक्ष खंडू कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा नयना लोंढे ,युवती अध्यक्षा शुभांगी साळुंखे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश वायदंडे, ज्योती साठे ,संभाजी चौगुले, विठ्ठल चौगुले, सातारा जिल्हाध्यक्ष संजय साठे, तुषार सावंत ,अनिल थोरात, बँड बँजो आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयभाऊ सावंत, सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा लताताई साठे ,शंकरराव चव्हाण ,जिल्हा सरचिटणीस अधिक चव्हाण ,सचिन खरात ,सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिपकराव गांजागोळ ,विजय सौंदडे, अण्णा फाळके ,संभाजी खिल्लारे इत्यादी सांगली, कोल्हापूर, सातारा ,सोलापूर व पूणे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.