Uncategorized

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही दिलेल्या योजना महाराष्ट्रात लागू होतील–मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भगीरथ भालके यांना विजयी करण्याचे केले आवाहन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सध्या देशातील जनतेला महागाईने त्रस्त केले आहे, तर भाजपने दिलेली एकही वचनं पूर्ण केलेली नाहीत. यामुळेच जनतेने लोकसभेत त्यांना धडा शिकवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही दिलेली वचनं आम्ही पूर्ण करत आहोत. मोफत बस सेवा, महिलांच्या खात्यात दरमहा ३००० रुपये जमा करणे, तसेच स्वयंपाकासाठी सहा गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत देण्याच्या योजना आम्ही राबवत आहोत.महाविकास आघाडीने असाच वचननामा जाहीर केला आहे.महाराष्ट्र राज्यातही महाविकास आघाडीचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या सर्व योजना महाराष्ट्रात लागू होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

आज महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे 252  मंगळवेढा पंढरपूर अधिकृत उमेदवार भगिरथदादा भारत भालके यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांची मंगळवेढा येथे जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी सिद्धरामय्या यांचे विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन स्वागत केले. या प्रसंगी देशाची माजी गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे,कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री व विजापूरचे पालकमंत्री . एम.बी. पाटील साहेब, सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे ,तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी येत्या २० तारखेला “हाताचा पंजा” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close