पुरोगामी संघर्ष परिषदेच्या तासगांव तालुकाध्यक्षपदी दिपाली फाळके

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी सौ. दिपाली फाळके यांना निवडीचे पत्र देताना ग्रामीण जिल्हा अध्यक्षा सौ. पुनम फाळके, राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाश फाळके व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
वायफळे-(ता.तासगाव) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या तासगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वायफळे (ता. तासगाव) येथील सौ. दिपाली तमाजी फाळके यांची निवड करण्यात आली असून, पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा सौ. पुनम फाळके यांनी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे निवडीचे पत्र राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाश फाळके यांचे प्रमुख उपस्थितीत तासगाव तालुका कार्यकारणीच्या वायफळे येथील बैठकीत देऊन सत्कार केला.
यावेळी सौ पूनम फाळके म्हणाल्या सामाजिक चळवळीमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी देणार असून पुरुषांची चळवळीतील मक्तेदारी आता महिला घेतील.
निवडीनंतर दिपाली फाळके म्हणाल्या महिलांच्यासाठी जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम करेन.
स्वागत व प्रास्ताविक किसन फाळके यांनी केले.
सदर बैठकीस हिंदुराव फाळके, भगवान फाळके ,परशराम फाळके, पतंग फाळके, दिनकर फाळके, पप्पू फाळके, सागर फाळके, महेश फाळके, राहुल फाळके ,देवेंद्र फाळके, प्रमोद फाळके, सुखदेव फाळके, अंकुश फाळके, आनंदा कांबळे ,पिंटू फाळके, दीपक फाळके, शंकर थोरात, संजय फाळके, नरेश सावंत, अतिश कांबळे, रणजीत कांबळे, प्रेम फाळके, पिंटू फाळके, गोपी फाळके, संदीप फाळके, इंदुबाई फाळके, पुतळाबाई फाळके, जनाबाई फाळके इत्यादी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार जनाबाई फाळके यांनी मांनले.