आमसभेत शहरातील प्रश्न विचारणे योग्यच अवताडे समर्थकांची भूमिका!
माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी लायकी ओळखून बोलावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा दिला इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- आमदार अभिजीत पाटील यांचे समर्थक आमचे चळवळीतील सहकारी माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार समाधान आवताडे यांना हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आम सभा घ्यावी असे आव्हान केले होते. त्यांचे हे वक्तव्य चुकीचे असून आपली लायकी दाखवणारे आहे . यापुढे आमदार समाधान दादावर पातळी सोडून टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा तर समाधान दादा अवताडे यांचे समर्थकांनी आमदार समाधान दादा अवताडे संपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषदेत घेऊन दिला. यावेळी नुकतीच पंढरपूर तालुक्याची, आमसभा चार आमदारांच्या उपस्थितीत झाली. नागरिकांनी अनेक प्रश्न विचारले विचारले अधिकाऱ्याने उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे.यावेळी पंढरपूर शहरातील प्रश्न करण्यात आले. हे योग्यच होते. त्याला विरोध करणे चुकीचे आहे. आमदार साहेबांकडे जेवढ्या तक्रारी आल्या त्या सोडविण्याचा प्रयत्न झाला असून सर्व कामावर मुख्याधिकारी हॆ स्वतः लक्ष देत असल्याने शहरासाठी आमसभा घेण्याची आवश्यकता वाटली नाही.गरज पडल्यास आमदार साहेबांना सांगून पंढरपूर नगर परिषदेची आम सभा लावून पंढरपूरच्या नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जाईल. विकासाचे राजकारण करणे हा आमचा मूळ हेतू आहे. अशी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेला दत्तात्रय काळे, शंकर सुरवसे, शेखर भोसले, संदीप पाटील, संतोष डोंगरे, विनोद लटके, द्रोणाचार्य हाके, अनिल नागटिळक आदी उपस्थित होते.