Uncategorized

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ सूचना फलकाची कार्यवाही

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

इचलकरंजी :- येथील विभागीय अधिकारी , इचलकरंजी विभाग, इचलकरंजी , जिल्हा कोल्हापूर येथील कार्यालयातील परिसरात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत माहिती संबंधीचा सूचना फलक नागरिकांच्या माहिती साठी प्रदर्शित केलेला नव्हता. लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी २०१५ या वर्षा पासून महाराष्ट्र राज्यात केली आहे.त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत निरनिराळ्या प्रकारच्या सेवा ऑन लाईन शासकीय नियमाप्रमाणे विहित मुदतीत पात्र नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु या कायद्यातील तरतुदींनुसार माहिती सूचना फलक लावण्याची कार्यवाही विभागीय अधिकारी , इचलकरंजी विभाग, इचलकरंजी येथील कार्यालयात झालेली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या यशदा, पुणे, या शिखर संस्थेतील माहिती अधिकार प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी प्रा.डॉ. वा.निं. साळवे यांनी राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे महसूली विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडे अपील सादर केले होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये कार्यालयात सूचना फलक प्रदर्शित करण्यात यावा , यासंबंधीचा आदेश राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे विभाग पुणे यांनी उपविभागीय अधिकारी , इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांचे कार्यालयास दिला आहे.त्यानुसार विभागीय अधिकारी , इचलकरंजी विभाग, इचलकरंजी येथील कार्यालयात नागरिकांसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सूचना फलक लावण्याची कार्यवाही केली आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये केलेल्या माहिती अर्जा नुसार संबंधित माहिती डॉ. वामन निंबाजी साळवे यांना मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close