Uncategorized

पंढरपूरात खेळ मांडियेला.. वाळवंटी काटी म्हणत..आदेश भाऊजींच्या कार्यक्रमास अलोट गर्दी

चंद्रभागेच्या काठावर, आदेश भाऊजींच्या कार्यक्रमात तब्बल १५,००० माता-भगिनींचा सहभाग

विधानसभेची साखर पेरणी करत अभिजीत पाटीलच आमदार होणार महिला वर्गातून भरभरून आशीर्वाद

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

प्रतिनिधी / पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजीत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “खेळ मांडीयेला” या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे मैदान, पंढरपूर येथे करण्यात आले होते..

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात लाखो कुटुंबांना भेट देऊन कुटुंबातील माता-भगिनींना आनंद देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणाऱ्या लाडक्या “आदेश भाऊजी” म्हणजेच  आदेश बांदेकर यांचे निवेदन सूत्रसंचालन या कार्यक्रमाला लाभले..

गप्पा, गोष्टी, मनोरंजन यांच्यासह माता-भगिनींच्या कौशल्याला सुप्त गुणांना या कार्यक्रमामधून वाव मिळाला. शेकडो भगिनींनी यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली..

आयोजक विठ्ठल प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांची पर्वणी पंढरपूरकरांना अनुभवता येत असते. “खेळ मांडीयेला” या कार्यक्रमात तब्बल १५,००० हून अधिक महिला व नागरिकांनी यात सहभाग घेतला होता..

विकासासह पंढरपूरकरांची आपुलकीने काळजी घेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या अभिजीत आबांना माता-भगिनींनी भरभरून आशीर्वाद तर दिलेच परंतु येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत “आमचे अभिजीत आबाच” निश्चित आमदार होणार हे देखील मनोगतात मांडले..

तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना दोन क्षण आनंदाचे देऊन दैनंदिन कार्यातून क्षणभर विरंगुळा आणि समाधान देता यावा. असेच प्रतिसाद पुढील काळात साथ, आशीर्वाद पाठीशी असावे असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुसज्ज आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केल्याबद्दल चेअरमन अभिजीत पाटील यांनी कौतुक केले.

यावेळी धनश्री पतसंस्थेच्या संस्थापक शोभा काळुंगे, उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे, माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव, अभिजीत पाटील यांच्या मातोश्री जयश्री पाटील, जयमाला गायकवाड, सुमित्रा अभिजीत पाटील, राजश्री ताड, शिवसेना (उबाठा) संभाजीराजे शिंदे, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सरचिटणीस अभयसिंह जगताप, नागेश गंगेकर, आदित्य फत्तेपूरकर, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, माढा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब महाडिक, तसेच विठ्ठल कारखान्याचे संचालक, धाराशिव कारखान्याचे संचालक, डीव्हीपी बँकेचे संचालक मंडळासह तमाम पंढरपूर महिला भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close