एक हात मदतीचा; आपल्या माढेकरांना.. आमदार अभिजीत पाटील यांनी केले आवाहन


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-गेल्या ३-४ दिवसांपासून माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांना पूर परिस्थितीने अतिशय नागरिकांची बिकट अवस्था झाली असून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. शेतात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाली, घराघरांमध्ये पाणी शिरून उभा असलेला संसार मोडला आहे.
या प्रसंगांमध्येच मी देखील माझ्या परीने पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरु आहे. आपण देखील या परिस्थितीत शक्य होईल ती मदत प्रत्येकानं करावी. मोडलेला संसार उभा करताना अत्यावश्यक साहित्य, घरउपयोगी वस्तू, कपडे आणि अन्नधान्य पोहचविण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलावा.
माढा मतदारसंघातील परंतू पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये स्थायिक असलेल्या उद्योजक, अधिकारी, नोकरदारांनी आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी शक्य होईल ती मदतीचा हात पुढं करावा.

परिस्थिती खरंच फार गंभीर आहे. रात्रीचा दिवस करून लोकांसाठी काम सुरू आहे. आपणही हातभार लावाल हिच माफक अपेक्षा, हिच वेळ आपल्या लोकांना उभारी देण्याची आहे..



