संभाजी ब्रिगेड मधील योगदानाबद्दल अमरजित पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुणे :- दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी,पुणे येथे संभाजी ब्रिगेड केडर काॅन्क्लेव्ह या कार्यक्रमामध्ये गेली २५ वर्षाहून अधिक काळ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिव – फुले – शाहू – आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेमधील चळवळीमध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील गटाचे नेते,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य व दि.पंढरपूर मर्चंटस् को – बॅंकेचे संचालक अमरजित पाटील यांचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड,बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम,आमदार रोहित पवार,आमदार वल्लभ बेनके,जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षा जयश्रीताई शेळके आदी मान्यवर उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे ५०० संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थितीत होते.