करिअर बरोबरच विद्यार्थ्यांनी “माणूस” बनण्याचा प्रयत्न करावा:प्राचार्य डॉ. रामदास नाईकनवरे

——–
—
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
आटपाडी. दि. 3:-विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये विविध कलागुण कौशल्य आत्मसात करावे. त्याचबरोबर उज्वल करिअर साठी अभ्यासाची मेहनत घ्यावी. आणि आपला नैतिक विकास साधून आयुष्यात एक उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. असे विचार कला व विज्ञान महाविद्यालय व श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, डॉ. रामदास नाईकनवरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. श्रीराम ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी कला व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उत्तर विभाग मुंबईच्या सी. आय. डी विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक मा. सौ. सविता कदम व प्रा.दबडे सर होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस कसे सामोरे जावे ? अभ्यासाचे नियोजन कसे करावे? आत्मविश्वास कसा वाढवावा? व कायमस्वरूपी विद्यार्थीच राहून आपला व्यक्तिमत्व विकास कसा करावा? त्याचप्रमाणे, विद्यार्थी व विद्यार्थिनींने सायबर धोक्यांपासून कसे सुरक्षित रहावे? याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन करून पोक्सांतर्गत कायद्याची सविस्तर माहिती मा. पोलीस उपनिरीक्षक सौ. सविता कदम यांनी दिली.
त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन वेळीच करावे. योग्य नियोजन केल्यानंतर नक्कीच यश प्राप्त होते. असे उपप्राचार्य दबडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक उपनिरीक्षक, सविता कदम यांचा सत्कार प्रा. माधुरी मोरे यांच्या हस्ते व उपप्राचार्य दबडे सर यांचा सत्कार शाल श्रीफळ बुफे देऊन व फेटा बांधून प्राचार्य, डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, या कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रा. सुजित सपाटे व प्रा. अनिता चव्हाण यांनी आपले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका घाडगे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. टिंगरे सर व आभार प्रा. आडसूळ मॅडम यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाळासाहेब कदम, प्रा. बालाजी वाघमोडे, प्रा. भगत मॅडम, प्रा. ,प्रा. नागेश चंदनशिवे व मारुती हेगडे इत्यादी उपस्थित होते.




