स्वेरीच्या आठ प्राध्यापकांचा अभ्यास दौरा संपन्न हैद्राबाद येथील प्रयोगशाळांना भेट

छायाचित्र- स्वेरीच्या आठ प्राध्यापकांनी हैद्राबादच्या दोन प्रकल्पांना भेट देवून अभ्यास दौरा केला. यावेळी ‘तंत्रज्ञान इनक्युबेशन सेंटर’ मध्ये डावीकडून प्रा. यु. एल. अनुसे, प्रा. एस. एम. काळे, डॉ. एन. यू. कौटकर, प्रा. एस. आर. गवळी, डॉ. ए. पी. केने, कंपनीचे व्यवस्थापक रोहित ठाकूर प्रा. व्ही. आर. चव्हाण, प्रा. डी. डी. रोंगे, प्रा. ए. के. पारखे, दुसरे छायाचित्र ‘बिट्स पिलानी’ कंपनीत भेट दिल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांचे स्वागत केले.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ८ प्राध्यापकांनी दि.१६ आणि दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी या दोन दिवशी हैद्राबाद येथील दोन प्रसिद्ध नवोपक्रम केंद्रांना भेट दिली. स्वेरी मध्ये अत्याधुनिक इनक्युबेशन सेंटर स्थापन करणे आणि मायक्रोफ्लुइडिक संशोधनाचा विकास करणे या महत्वाच्या दोन कारणासाठी हा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला केला. या दौऱ्यातून स्वेरीच्या प्राध्यापकांनी अतिशय महत्वाची माहिती जाणून घेतली जी भविष्यात स्वेरीतील विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली,उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या या दोन दिवशीय अभ्यास दौऱ्यात संशोधन अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने, प्रा. डी. डी. रोंगे, प्रा. ए. के. पारखे, प्रा. एस. आर. गवळी, प्रा. एस. एम. काळे, प्रा. यु. एल. अनुसे, प्रा. व्ही. आर. चव्हाण व डॉ. एन. यू. कौटकर या आठ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. दि.१६ डिसेंबर रोजी सदरच्या ८ तज्ञ प्राध्यापकांनी आयआयटी हैदराबादच्या ‘तंत्रज्ञान इनक्युबेशन सेंटर (आयटीआयसी)’ ला भेट देवून तेथील माहिती जाणून घेतली. डीप-टेक स्टार्टअप्सना सहाय्य करणारे हे एक अग्रगण्य केंद्र आहे. १.५ लाख चौरस फूट परिसर असलेल्या आयटीआयसीने आयडेक्स, टिहान आणि निधी यांसारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमधून निधी मिळवून १९२ पेक्षा जास्त स्टार्टअप्स ना ऊर्जा देण्याचे कार्य केले आहे. व्यवस्थापक रोहित ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आयटीआयसी ची धोरणे, कार्यपद्धती आणि सुविधा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. या संवादातून पंढरपुरात आयटीआयसीसारखे यशस्वी मॉडेल तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतरच्या दिवशी दि. १७ डिसेंबर रोजी या पथकाने बिट्स पिलानी, हैदराबाद येथील एमईएमएस, मायक्रोफ्लुइडिक्स आणि नॅनोइलेक्ट्रॉनिक्स (एमएमएनई) लॅबला भेट दिली. या लॅबचे नेतृत्व बिट्सच्या सर्व कॅम्पसचे डीन आर अँड डी डॉ. संकेत गोयल यांनी केले. संचालक यूव्ही लेझर रायटर, रमन स्पेक्ट्रोमीटर आणि मायक्रोफ्लुइडिक ड्रॉपलेट जनरेटर यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांची माहिती त्यांनी दिली. मायक्रोफ्लुइडिक तंत्रज्ञान आणि उद्योग व शिक्षण व्यवस्था यांच्यातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. या दौऱ्यांतून अटल कम्युनिटी आणि इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) अंतर्गत इनक्युबेशन सेंटर संदर्भात उपयुक्त माहिती मिळाली असून संशोधन सुविधांच्या मजबुतीसाठी ही प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागात नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा फायदा स्वेरीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर बाबत होणार असून हा अभ्यासदौरा स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे.



