आवताडे शुगर कडून २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा – चेअरमन संजय आवताडे
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
प्रतिनिधी:-पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदुर. या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ मधील ३० नोव्हेंबर पर्यंतचे उसाचे बिल २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकरी¬ ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी माध्यमांना दिली . यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, सरव्यवस्थापक (टेक्नी) सुहास शिनगारे, मोहन पवार, संभाजी फाळके, बजीरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, तोहीद शेख, दामोदर रेवे उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की २ वर्षापूर्वी आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून आवताडे उद्योग समुहाने घेतल्यानंतर कारखान्याचा हा तिसरा हंगाम सुरू असून कारखान्याची वाटचाल व्यवस्थित सुरू आहे. आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नाही, आतापर्यंतच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी, ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे आम्ही मागील दोन्हीही गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले. यावेळीही असेच सहकार्य सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस उत्पादक हे करत असून आजअखेर 2 लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा कारभार करून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपला ऊस आवताडे शुगरला घालून सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन संजय आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
खालील शाखेत उसबिले जमा
बबनराव आवताडे पतसंस्था – शाखा मंगळवेढा
मंगळवेढा, कचरेवाडी, घरनिक्की, धर्मगाव, खडकी, मल्लेवाडी, खोमनाळ, चिख्खलगी, शिरनांदगी, तावशी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, रांजणी, चिचुंबे, सिद्धेवाडी, शिरगाव, एकलासपूर, ढवळस, लक्ष्मी दहिवडी, मुढवी, मारापुर,
बबनराव आवताडे पतसंस्था – शाखा मरवडे
मरवडे, येड्राव, निंबोणी, हुलजंती, माळेवाडी, तळसंगी, भाळवणी (मंगळवेढा), डोणज, नंदुर, बनतांडा, कागष्ट, कत्राळ-कर्जाळ
बबनराव आवताडे पतसंस्था – शाखा माचणुर
माचणुर, ब्रम्हपुरी, मुंडेवाडी, रहाटेवाडी, तांमदर्डी, अर्धनारी, सोहाळे, कोथाळे, इचगाव, येणकी, मिरी, अरबळी, वटवटे, वडदेगाव, नळी, आंबेचिंचोली, बेगमपूर, पुळुज, पुळुजवाडी, औंढी, पाटकुल, टाकळी सिकंदर, खरसोळी, तारापूर.
यशोदा पतसंस्था- शाखा मंगळवेढा
अकोले (भि), शेलेवाडी, गणेशवाडी, शरदनगर, ढेकळेवाडी, नंदेश्वर, भोसे, बठाण, गुंजेगाव, उचेठाण, महमदाबाद (शे)
*लक्ष्मी पतसंस्था-शाखा आरळी*
अरळी, बोराळे, तेलगाव भीमा (दक्षिण), दसुर (कर्नाटक), सिद्धापूर, तांडोर
भैरवनाथ पतसंस्था – शाखा कंदलगाव
भंडारकवठे, कुसूर, मंद्रूप*
भंडारकवटे, तेरामैल, वडापूर, बाळगी, निम्बर्गी, कंदलगाव, गुंजेगाव (द सो), अकोले (मंद्रूप) औराद, लवंगी (दक्षिण सोलापूर), मनगोळी, अंत्रोळी, माळकवठे, मंद्रूप, सादेपूर, कारकल, विंचूर, कुसुर, बरुर, टाकळी दक्षिण, नांदणी, राजुरी
सिद्धश्री पतसंस्था – कर्नाटका मधील सर्व उस पुरवठादार..
===================================================