राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली चे सदस्य माननीय. डॉ. पी. पी. वावा यांचा सफाई कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत दौरा
पंढरपूर नगरपरिषद मधील १३ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले नियुक्ती आदेश
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली चे सदस्य पी पी वावा यांनी दिनांक ३ ते १० जानेवारी २०२५ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाऊन नगरपरिषदांना भेटी देऊन राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि अडचणीवर चर्चा करणे बाबत दौरा आयोजित केला आहे
या निमित्ताने त्यांनी पंढरपूर येथील विश्राम धाम येथे पंढरपूर नगरपरिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी बाबत मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर नगर अभियंता नेताजी पवार यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.
यावेळी पंढरपूर नगरपरिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीचे दृष्टीने आढावा घेण्यात आला
यामध्ये प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे बांधून देणे,लाड पागे शिफारशीनुसार नेमणुका करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नती करिता त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची बचत गट निर्माण करून त्यांनाही व्यवसाया साठी कर्ज उपलब्ध करून देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार काम देणे, सफाई कर्मचारी कायम घाण साफसफाई चे काम करत असतात त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने आरोग्यदृष्ट्या सक्षम राहणे करिता प्रत्येक चार महिन्याला आरोग्य शिबीर घेऊन आरोग्य तपासणी करणे, सफाई कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम विमा उतरविणे, गुजराती कॉलनी येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरुस्ती करणे त्या ठिकाणी लायब्ररी निर्माण करणे ओपन जिम तयार करणे व इतर सेवा सुविधा कर्मचाऱ्यांना देणे, महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजींग रूम तयार करणे यावर चर्चा करण्यात आली
सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच जिल्हाधिकारी साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले आहेत व वरील मुद्द्यांपैकी अनेक मागण्या यापूर्वीच वेळोवेळी संघटनेशी चर्चा करून मान्य करण्यात आल्या होत्या व त्यातील काही कामांची पूर्तता ही करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी पी वावा साहेब यांचे समोर सादर करण्यात आली यात प्रामुख्याने सफाई कर्मचारी यांना 600 चौरस फुटाचे कायम स्वरुपी घर बांधून प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून सदरची शासनाची अंतिम मंजुरी मिळेल नंतर त्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी चांगला निवारा मिळणार आहे व इतरही अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल डॉ.पी पी वावा यांनी नगर परिषद प्रशासनाचे कौतुक केले व लवकरात लवकर सफाई कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्यांना हक्काची घरे मिळणे बाबत आशावाद व्यक्त केला. यावेळी १३ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश देण्यात आले यावेळी डॉ. पी.पी. वावा सदस्य राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग यांचे सल्लागार गिरी नाथ व संदीप चरण मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर,नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे व नागनाथ तोडकर, जनसंपर्क अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक सुवर्णा हाके, आस्थापना लिपिक ऋषी अधटराव, चिदानंद सर्वगोड, चेतन चव्हाण व अखिल भारतीय सफाई काँग्रेस युनियनचे अध्यक्ष श्री गुरु दोडिया त्यांचे सहकारी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना चे अध्यक्ष महादेव आदापुरे नानासाहेब वाघमारे,धनजी वाघमारे, संतोष सर्वगोड, दत्तात्रय चंदनशिवे,दिनेश साठे,जयंत पवार,अनिल गोयल, सतीश सोलंकी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.