साहित्यिका अस्मिता मेश्राम, भंडारा यांची जीवनदीप पुरस्कार – २०२५ करीता निवड
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
भंडारा,:- महाराष्ट्र येथील मराठी/ हिंदी साहित्यिका अस्मिता मेश्राम (अस्मिता प्रशांत “पुष्पांजली” ) यांना अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषद अजुर्नी/ मोरगाव जि.गोंदिया यांचे “जीवनदीप पुरस्कार २०२५” जाहीर झाले असून १९ जानेवारी २०२५ रोजी दुसरे अखिल भारतीय साहित्य परिषद संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.
अस्मिता मेश्राम यांना हे पुरस्कार त्यांची “पटाचारा” या वैचारिक पुस्तकांची दखल घेऊन घोषित झाले आहे.
अस्मिता मेश्राम २०१५ पासून साहित्य क्षेत्रात सातत्याने लिखाण कार्य करीत असून, मराठी/हिंदी कथा, कादंबरी, कविता, माहिती संग्रह, समुपदेशन पुस्तक अशा एकुण १५ पुस्तका त्यांच्या प्रकाशित आहे. व अनेक वॄत्तपत्र, साप्ताहिक,मासिक, विशेषांक मधे महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर त्यांचे वैचारिक, ललित, कथा, कहानी,कविता प्रकाशित होत असतात.
त्या “स्त्री दर्पण” या ८ मार्च ला प्रकाशित होणारे द्विभाषिक स्त्री विशेष विशेषांक च्या संपादिका आहेत. व शासन सेवेत कार्यरत आहेत.
जीवन दीप पुरस्कार साठी निवड झाल्याचे जाहीर होताच परिचितांनमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सा. जोशाबा टाईम्स परिवाराचे वतीने अभिनंदन!