पत्रकारितेत नवा जुना पत्रकार असं काही नसतं, तरुण पत्रकारही सरस कामगिरी करताहेत – पत्रकार प्रशांत आराध्ये
पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी हुसेन नदाफ तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम कदम व जैनुद्दीन मुलाणी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) : पत्रकारितेत नवा जुना पत्रकार असं काही नसतं, तरुण पत्रकारही सरस कामगिरी करताहेत त्यांचं कौतुक वाटतं पण जेष्ठ पत्रकारांनाही नवीन पत्रकारांनी योग्य मान दिला पाहिजे असे मत पंढरीतील जेष्ठ पत्रकार प्रशांत आराध्ये यांनी व्यक्त केलं.
प्रशांत आराध्ये यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीची बैठक पत्रकार भवन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 2025-2026 या सालासाठी नुतन पदाधिकाऱ्यांच्या समितीचे मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार देशपांडे व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. यावेळी आराध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारांची संख्या वाढली तर वाढु द्या, संघटना वाढल्या तरी वाढु द्या, परंतु पत्रकारांनी आपल्यातली एकी कायम ठेवा. पत्रकार संरक्षण समितीचं काम चांगलं आहे. या संघटनेनं आपलं स्वतःचं वेगळ अस्तित्व निर्माण करून ते टिकवून ठेवलंय हे महत्वपूर्ण आहे. या शब्दात त्यांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक करत नवीन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्षपदी एस.पी.न्यूजचे हुसेन नदाफ, तालुकाध्यक्षपदी दै. दिव्य मराठीचे लक्ष्मण जाधव, उपाध्यक्षपदी सा.धन्यवादचे कार्यकारी संपादक विक्रम कदम, उपाध्यक्षपदी सा.राष्ट्र युवा चेतना चे जैनुद्दीन मुलाणी, कार्याध्यक्षपदी शोध न्युज चे अनिल सोनवणे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच सचिवपदी प्रकाश सरताळे, सहसचिव मुकुंद माने-देशमुख, खजिनदारपदी संजय हेगडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी शंकरराव पवार यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर सर्वनुतन पदाधिकारी यांचेसह संघटनेतील सर्वांचेच सत्कार करण्यात आले.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य आणि आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकरराव पवार यांनी केलं तर आभार श्रीकांत कसबे यांनी मानले.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य ज्येष्ठ संपादक शंकरराव कदम, माजी अध्यक्ष श्रीकांत कसबे, गौतम जाधव, माजी अध्यक्ष यशवंत कुंभार, माजी अध्यक्ष झाकीर नदाफ, सागर भैय्या सोनवणे, अमोल कुलकर्णी, भारत शिंदे, सचिन दळवी, मिलिंद गायकवाड, उमेश टोमके, डॉ.डी.डी पाटोळे व डॉ. राजेश फडे आदी उपस्थित होते.