Uncategorized

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्यावतीने  विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार 14 एप्रिलला पुरस्काराचे वितरण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

  1. पंढरपूर- महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने 132 वी जयंती महाउत्सव समितीच्या वतीने दि.14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहराचे नावलौकिक केल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सन्मान व पंढरपूर शहरातील आदर्श महिला बचत गट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी खालील मान्यवरांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज.सर्वगोड यांनी केलेले आहे.
या कार्यक्रमास श्री वि.रू.मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,चेअरमन अभिजीत लक्ष्मण ढोबळे, मा.आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, मा.आमदार दत्तात्रय सावंत, अभिजीतआबा पाटील, अनिल सावंत, भगिरथदादा भालके, डॉ.बी.पी.रोंगे, कल्याणराव काळे, दिलीपबापू धोत्रे, अजयकुमार सर्वगोड, नागेश भोसले, उज्वला हाके मॅडम, लक्ष्मण पापरकर, ऍड.दत्तात्रय खडतरे, प्रभाकर भैय्या देशमुख, नानासाहेब कदम आदि मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे (सर), जयंती समिती अध्यक्ष भाई नितीन काळे, विलास जगधने सर, सोहन जैस्वाल,  आदम बागवान, डॉ.अक्षय देशपांडे, सचिन माने, आण्णा धोत्रे, विनोद धुमाळ, श्रीमती वंदनाताई कसबे, रिहाना आत्तार, राबिया टिनमेकर,रोहीत जाधव, प्रथमेश सर्वगोड, प्रतिक कुंभार, प्रा.मारूती मस्के, सचिन माने, प्रा.सुदाम गायकवाड, दिलीप देवकुळे, विशाल आर्वे, रामदास सर्वगोड, प्रा.रविराज कांबळे, प्रा.सागर शिवशरण, आशाताई बागल, प्रा.ज्ञानदेव कांबळे, श्रीकांत कसबे, विकास वाघमारे, आनंद थोरात, निशा फुले-देवमारे, प्रकाश (बुवा)अभंगराव, सुरेश नवले, रामदास नागटिळक आदि उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 27 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये 1) प्रबुध्द “विधिज्ञ’ पुरस्कार- ऍड.भगवान मुळे 2) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार- संदिप माने, माऊली हळणवर, श्रीकांत शिंदे, 3) वर्धमान महावीर “अहिंसारत्न’ पुरस्कार-संजय शांतीलाल शहा 4) राष्ट्रसंत रोहिदास महाराज “प्रबोधनरत्न’ पुरस्कार-ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, ह.भ.प.दिनकर रमेश पिंगळे (काका) सांगवी पुणे 5) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार- वैभव भानुदास कडलाख (पुणे), शहाजहान राजमहंमद तांबोळी, सुर्यकांत दत्तात्रय पारखे 6) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार-बालाजी सलगर, विनोद लटके, नाथा काळे, सुरज रोंगे, निशाताई विनोद धुमाळ, उमाताई नंदकुमार डोंबे, संजय प्रल्हाद मस्के  7) महात्मा बसवेश्वर “समाजभूषण’ पुरस्कार- श्वेताताई निलराज डोंबे, रणजित श्रीधर शिंदे (सांगली), पल्लवी आनंद लोंढे (व्होळे) 8) राष्ट्रपिता महात्मा फुले “समाजरत्न’ पुरस्कार- प्रकाश खंदारे (मंगळवेढा), राहुल नागनाथ गावडे, प्रा.नागनाथ दत्तात्रय घोरपडे (शिरभावी), धनाजी जोशी (देगलूर), बापूसाहेब मेटकरी (पाटखळ), आतिश लक्ष्मण शिरसट (सोलापूर), पंकज देवकते, अमोल कुंभार, दत्ताभाऊ वाकसे, मनिषा परमेश्वर कांबळे 9) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “शिक्षणभूषण’ पुरस्कार-सुनंदा ज्ञानेश्वर शेगावकर, स्मिता पाटील (रायगड) 10) राष्ट्रसंत गाडगे महाराज “शिक्षणरत्न’ पुरस्कार-डॉ.कैलास कारंडे, कांतीलाल वाघमारे, अनिल लवटे, जयकुमार व्यवहारे, उत्तरेश्वर मुंडे, दयानंद पाटील, सुनिल विश्वासे, विलास घोळवे, जनार्दन परकाळे, नवनाथ गायकवाड (धोंडेवाडी),प्रा.सुधाकर पिसे 11) नारायण मेघाजी लोखंडे “कामगाररत्न’ पुरस्कार-महादेव आदापुरे, अशोक आलदर 12) डॉ.सी.के.बोले “वैद्यकीयरत्न’ पुरस्कार- डॉ.सुनिल कारंडे, डॉ.बजरंग धोत्रे, डॉ.पंकज भिवटे (बुलढाणा) 13) राजश्री शाहू महाराज “क्रिडारत्न’ पुरस्कार- राहुल बळी धोत्रे, संदिप फडतरे,नम्रता सत्यवान माळी 14) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया)- अभय जोशी दै.सकाळ, दादासाहेब नागनाथ कदम दै.सांगली तरूण भारत, संजीव भांबोरे 15) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया)-सुनिल दिवाण 16) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया)-सुदर्शन खंदारे 17) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) भारत नागणे 18) साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे “साहित्यरत्न’ पुरस्कार- अशोक पातोंडा (अकोला), गिरीधर इंगोले (अजनाळे) 19) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार- जीवन सुखदेव घोडके (पाटकुल), संजय लगड (छत्रपती संभाजीनगर), विशाल गुंड (पुणे) 20) डॉ.पंजाबराव देशमुख “कृषीरत्न’ पुरस्कार- सचिन आत्माराम होळकर (लासलगांव जि.नाशिक), दिपक बनसोडे, दादासाहेब दगडे (दौंड) 21) भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या “स्थापत्यरत्न’ पुरस्कार- अक्षयअजयकुमार सर्वगोड (मुंबई), आण्णा पांडुरंग वायदंडे (देगाव) 22) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम “विज्ञानरत्न’ पुरस्कार- सोमनाथ माळी (सरकोली) 23) माता जिजाऊ “आदर्शमाता’ पुरस्कार- शोभा वसंत बंगाळे (अजनसोंड) 24) माता रमाई “आदर्श पत्नी’ पुस्कार-पूजा श्रीधर पिसे 25) वीर शिवा काशीद “वीररत्न’ पुरस्कार-माऊली चव्हाण 26) गौतम राजाध्यक्ष “फोटोग्राफररत्न’ पुरस्कार- बशीर शेख 27) कर्मवीर भाऊराव पाटील “जीवन गौरव’ पुरस्कार-डॉ.सुभाषराव (आबासाहेब) सोनवणे, शामराव अनंता शिंगटे (जैनवाडी) यांना जाहीर करण्यात आलेले आहेत. तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहराचा नावलौकिक केल्याबद्दल  पंढरीरत्न पुरस्कार देवून  डॉ.द.ता.भोसले (ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक) अजयकुमार सिताराम सर्वगोड (नुतन कार्यकारी अभियंता, सार्व.बांधकाम वि.कणकवली), प्रा.चांगदेव कांबळे (के.बी.पी.महाविद्यालय, संचालक के.आय.ओ.सी.एल.लि.स्टील मंत्रालय भारत सरकार), दि पंढरपूर अर्बन को.ऑप.बॅंकेचे नुतन चेअरमन सतीश मुळे, नुतन व्हा.चेअरमन माधुरी जोशी, गौतम विद्यालयाचे नुतन मुख्याध्यापक नंदकुमार मोतीराम वाघमारे,विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूरचे नुतन मुख्याध्यापक राजेंद्र पाराध्ये सर, गौतम विद्यालयचे मा.मुख्याध्यापक दशरथ दोडके सर, मोहन अनपट (चिंचणी), शांताप्रभू प्रशाला अजनसोंडचे विक्रांत लक्ष्मण सर्वगोड सर, के.बी.पी.महाविद्यालयाचे प्रा.रविराज कांबळे, मा.उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडीचे रविंद्र कांबळे, सिकंदर ढवळे सर, बॉक्सिंग ऑफ इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडल विजेते अभिजीत चव्हाण, मास्टर ऑफ सायन्स (भौतिक शास्त्र)चे कैलास आदित्य मेहडा,  सॅम्बो स्पर्धा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक विजेते विक्रांत रामदास नागटिळक, राज्यस्तरीय वुशू सुवर्ण पदक विजेत्या सुहासिनी उमेश चव्हाण, राज्यस्तरीय बॉक्सिंग सुवर्ण पदक विजेते यश सतीश चव्हाण, इन वुशू गेम अँड सिलेक्शन फॉर स्टेट लेव्हल बॉक्सिंगचे स्टेट लेव्हल गोल्ड मेडिलिस्ट कु.प्रतिक्षा चौधरी, 107 वेळा रक्तदान करणारे लक्ष्मीकांत दगडू खुळपे, केंद्रीय स्त्रीप्रतिष्ठा समितीच्या नुतन अध्यक्षा कु.सायली दिपक वाडदेकर, वुशू डिव्हीजन लेव्हल गोड मेडल विजेते प्रतिक पांडुरंग चौधरी,राष्ट्रीय जानकी पुरस्कार प्राप्त खो-खो खेळाडू कु.प्रिती काळे यांना देण्यात येणार आहेत तसेच पंढरपूर शहरातील आदर्श महिला बचत गट पुरस्कार – मिरा सय्यद स्वयंसहाय्यता महिला बचत गट, मॉं जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट, यशोधरा स्वयंसहाय्यता महिला बचत गट, चैत्र गणा स्वयंसहाय्यता बचत गट, बालाजी स्वयंसहाय्यता महिला बचत गट,श्रवणी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता महिला बचत गट, हरिनंदन स्वयंसहाय्यता महिला बचत गट, सिध्दी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, उपासना स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close