Uncategorized

फुले आंबेडकरी चळवळीचे क्रियाशिल कार्यकर्ते   विजयकुमार कांबळे यांचे एकसष्टाव्या वर्षात पदार्पण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-फुले आंबेडकरी चळवळीचे क्रियाशिल कार्यकर्ते,दलित स्वयंसेवक संघाचे राज्य सरचिटणीस, समतासैनिक दलाचे पदाधिकारी, महानगर पालिका सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार कांबळे यांचा२१नोव्हेंबर रोजी साठावा वाढदिवस संपन्न होत आहे.
२१नोव्हेंबर १९६२रोजी त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे मुळ गाव वांगी ता.उत्तर सोलापूर हे होय.त्यांचे आई वडील अशिक्षित होते ते चाकु सुर्याला धार लावण्याचे कार्य करित होते.तसेच आठवडा बाजार, जत्रा,यात्रा,वारी येथे चाकू सुरी,अडकित्ते,कात्री,खुरपी याची विक्री करत .त्यांना एकुण सहा मुली व तिन मुले असा परिवार होता. शिक्षणाचे महत्व जाणून आई ताराबाई व वडील गोविंद यांनी खडतर परिस्थीतून सर्वांना शिक्षण दिले.
विजयकुमार यांचे प्राथमिक शिक्षण श्राविका हायस्कूल सोलापुर येथे झाले तर पाचवी ते सातवीं पर्यंत जैन गुरुकुल हायस्कूल येथे तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वडाळा येथे झाले.पदवीपर्यंत शिक्षण पुणे येथे तर पदवीत्युर एम एस डब्ल्यू शिवाजी विद्यापीठ येथे पुर्ण केले.

न्यू बुधवार पेठ हे चळवळीचे केंद्र होते.विद्यार्थी दशेतच असताना विजयकुमार यांचा दिवंगत एस.आर.गायकवाड़, राजा इंगळे,राजा सरवदे,सिद्राम सोनकांबळे या त्यावेळेस चळवळीत अग्रैसर असणार्या कार्यकर्त्याशी संबध आला व ते त्यांच्या प्रेरणेणे आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले. त्यावेळेस  डाँ.आंबेडकर स्टुडंट असोशिएशनचे काम सुरु केले.
पुणे येथे असताना मातंग समाजे नेते दिवंगत मोहन वाघमारे,दिवंगत मोहन ननवरे,रमेश राक्षे यांचेशी व दलित स्वंयसेवक संघाशी संबंध आला.
नोकरी व सामाजिक संघटनेत कार्य करीत असतानाच १९८७साली त्यांचा विवाहगोविंद चव्हाण मसले यांची कन्या संगिताशी विवाह झाला.संसारवेलीवर एक पुत्र व तिन कन्या यांचे आगमन झाले. मुलगी शितल पारखे ही मूकबधिर तुन बीएबिएड झाली तर सोनल पारखे इंजीनियर तर तिसरी मुलगी सृष्टि हि पुणे येथे विमान व्यवस्थापनाचा कोर्स करीत आहे.तर मुलगा शांतीसागर समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए,डी.एच.एल.एस.,एम.एस.डब्ल्यू,पीजीसी इन जनरल स्टडीज,पिडीजी,सीएसआर, डीपी अँड एस आय,एम ए इन पाली इत्यादि डिग्र्या घेतल्या असून सध्या पुणे येथे आंतरराष्ट्रीय कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून नोकरी करत आहे.
विजयकुमार यांनी दलित स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी म्हणून अनेक सामाजिक आंदोलनात भाग घेतला.यामध्ये प्रामुख्याने अनिता बसवंत बलत्कार व खुन प्रकरण,सिकंदर टाकळी येथील मातंग वस्ती जळीत प्रकरण,बार्शी येथिल अमोल कसबे खुन प्रकरण,आदी महत्वपूर्ण प्रकरणात त्यांनी आवाज उठविला .तसेच आर एस एस चा व मनुस्मृतिचा निषेध म्हणुन मनुच्या पुतळ्याचे मेकँनिकल चौक येथे दहन केले.
दलित स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून मातंग समाजातील अंधश्रध्दा,व्यसनाधिनता,वाघ्या मुरळी, पोतराज या प्रथा निर्मुलन करण्याचा प्रयत्न केला.
महानगर पालिका कर्मचारी म्हणून त्यांनी कामगार आंदोलनात भाग घेतला.त्यांचा कार्याचा गौरव म्हणून अनेक सामाजिक संघटनेने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
सा.जोशाबा टाईम्स साठीही त्यांचे सातत्याने योगदान असते.अशा या चळीवळीत सक्रिय कसणार्या आमचा सहकारी मित्र आज साठावे वर्ष पुर्ण करुन एकशष्ठीत पदार्पण करीत आहे.

सा.जोशाबा टाईम्स च्या वतीने विजयकुमार कांबळे यांना वाढदिवसानिमीत्त हार्दिक शूभेच्छा!
पुढील आयुष्य सुखसमृध्दीचे व भरभराटीचे जावो!

यासाठी त्यांना दिर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा!!

—-  श्रीकांत कसबे,पंढरपुर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close