. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परीवाराची भूमिका नाही–अनिल सावंत

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या लिंक रोड पंढरपूर याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती. महाविकास आघाडी कडून अभिजीत पाटील, आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे रिंगणात आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघ तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषेदेसाठी माढा मतदार संघातील सावंत परिवार सावंत गटाचे सर्व नेते आणि त्यांचे सर्व नातेवाईकानी त्यांची भूमिका मांडली
अनिल सावंत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणले,
प्रा. शिवाजी सावंत हे माझे काका आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अनपेक्षितपणे एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला . साहजिकच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो मात्र आदरणीय प्रा. शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे.
त्यांच्या भूमिकेशी सावंत परिवार आणि त्यांच्या गटाचे कोणीही सहमत नाही. आमच्या परिवारातील सर्व सदस्यांचा अभिजीत पाटील यांना सक्रिय पाठिंबा आहे. माढ्यामधून अभिजीत पाटील निश्चितपणे निवडून येतील.
या पत्रकार परिषदेमध्ये अनिल सावंत, रवी सावंत, विजय सावंत, आणि सावंत परिवारातील रामा – मुसारे बाकाव,डॉ. श्रीमंत कोकटे सर,आकाश लोंढे,सूर्यकांत आप्पा शेंडगे – (मा. पंचायत समिती सदस्य)रामचंद्र मरके ( जिल्ला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँ पार्टी)बाळासाहेब गाडे पाटील सरपंच चादज,भजनदास वामन खटके माढा तालुका नेते,संतोष ढवळे युवा नेते मगन महाडीकरा.कॉ. नेते,तानाजी लोढे (सर)जावई,विकास पाटील -युवा नेते,भारत पाटील माढा तालूका नेते,रंगनाथ पाटील युवा नेते निशिकांत कोखे,कृष्णाजी लोढे( मा. आ. सदस्य लोंढेवाड)अंकुश लोढे,समाधान मस्के (उपसरपंच (उपसरपंच उदरभाव सुंदरगाव ) सत्यम लोढे,शिवाजी कबाडे.-आदी उपस्थित होते.